सद्गुरु नाथा हात जोडीतो अंत नको पाहू Lyrics | Sadguru Nath Hat Jodito
नमस्कार या पोस्ट मध्ये आपण सद्गुरु नाथा हात जोडीतो अंत नको पाहू Lyrics बघणार आहोत.
सद्गुरु नाथा हात जोडीतो अंत नको पाहू Lyrics | Marathi
॥ श्री स्वामी समर्थ ॥
सद्गुरू नाथा हात जोडितो अंत नको पाहू
उकलुनी मनीचे हितगुज सारे वद कवणा दावू ।। धृ ||
निशीदिनी श्रमसी मम् हितार्थ तू किती तुज शीण देऊ
हृदयी वससी परी नच दिससी कैसे तुज पाहू ॥
सद्गुरू नाथा हात जोडितो ... || 1 ||
उत्तीर्ण नव्हे तुज उपकारा जरी तनु तुज वाहू
बोधुनि दाविसी इहपर नश्वर मनी उठला बाऊ ॥
सद्गुरू नाथा हात जोडितो ... || 2 ||
कोण कुठील मी कवण कार्य मम जनी कैसा राहू
करी मज ऐसा निर्भय निश्चल सम सकला पाहू ॥
सद्गुरू नाथा हात जोडितो ... || 3 ||
अजाण हतबल भ्रमित मनीची तळमळ कशी साहू
निरसुनी माया दावी अनुभव प्रचीती नको पाहू ॥
सद्गुरू नाथा हात जोडितो ... || 4 ||
* * * * * *
खालील भक्तिगीते पण जरूर वाचा 👇👇👇
- अंतरंगी रंगलेले स्वरूप मी पाहतो Lyrics
- मन लागो रे लागो रे माझे गुरु भजनी Lyrics
- धाव पाव स्वामी समर्था Lyrics
- सद्गुरु तू माय मी लेकरू तुला कसा विसरू Lyrics
तर आज या पोस्ट मध्ये आपण सद्गुरु नाथा हात जोडीतो अंत नको पाहू Lyrics बघितले. अधिक मराठी लिरिक्स वाचण्यासाठी True Marathi Lyrics ला पुन्हा भेट नक्की द्या.
पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद !!!!!!!! 🙏🙏🙏🙏
Post a Comment