दत्त नामाचा गजर करा भजन Lyrics | Datta Namacha Gajar Kara
नमस्कार या पोस्टमध्ये आपण दत्त नामाचा गजर करा भजन Lyrics बघणार आहोत.
दत्तगुरुंचे खूपच सुंदर असे हे भजन आहे.
_________________________
🌸 दत्त नामाचा गजर करा भजन Lyrics🌸
|| श्री गुरुदेव दत्त ||
दत्त नामाचा गजर करा
प्रपंच सुखी करा
या देहाचा उद्धार करा
प्रपंच सुखी करा ||धृ ||
ब्रम्हा विष्णू महेश्वर
साक्षात दत्त दिगंबर
भक्तांच्या हो कल्याणा
अवतरले ते धरतीवर
दावी सुखाचा मार्ग खरा
प्रपंच सुखी करा.. || 1 ||
अत्री अनुसया नंदन
त्रिदेव हे महान
दत्त दत्त नाम स्मरता
प्रसन्न होती भगवान
वाहे भक्तीचा निर्झर झरा
प्रपंच सुखी करा || 2 ||
दत्त दिगंबर अवधूत
माऊली वसली हृदयात
रंगुनी जाऊ भजनात
आनंद मिळे जीवनात
दुःखाला न मिळे थारा..
प्रपंच सुखी करा,... || 3 ||
* * * * * *
_______________________
✅ही भक्ती गीते पण नक्की वाचा 👇👇👇
- दत्ता अवधूता तुझे रे मला वेड लागले Lyrics
- दत्ता अवधूता तुम्ही कधी हो येणार Lyrics
- रात्रंदिवसा देवा तुमची मूर्ती ध्यानात Lyrics
____________________________
📜📜पोस्ट पूर्ण असल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏🙏🙏🙏 !!!!!!!
__________________________
Post a Comment