Header Ads

घरादाराला धरून बसणार काय भजन Lyrics | Gharadarala Dharun Basnar Kay



नमस्कार या पोस्टमध्ये आपण घरादाराला धरून बसणार काय भजन Lyrics बघणार आहोत. आपल्या जीवनाचे खरे वास्तविक स्वरूप दाखवून देणारे खूपच हृदयस्पर्शी असे हे भजन आहे.

__________________________

🌸घरादाराला धरून बसणार काय भजन Lyrics 🌸

घरादाराला धरून बसणार काय |
धनसंपत्ती सोबत येणार नाय || धृ ||

जोवर आहे अंगात बळ |
तोवर तू सोसली कळ ||
अशी गर्वाने वागू नको माझी माय |
धनसंपत्ती सोबत येणार नाय || १ ||

कोणाचे घर कोणाचे दार |
लावून बसला जीवाला घोर ||
मुखाने तू हरिनाम घेऊन पाय |
धनसंपत्ती सोबत येणार नाय || २ ||

कोणाचा बंगला कोणाची गाडी |
कोणाची शेती न कोणाची वाडी ||
हरी भजनात एक वेळा जाऊन पाय |
धनसंपत्ती सोबत येणार नाय || ३ ||

घरादाराला धरून बसणार काय |
धनसंपत्ती सोबत येणार नाय ||

* * * * * *
__________________________


✅ही भक्ती गीते पण नक्की वाचा👇👇👇
__________________________

👀आज या पोस्टमध्ये आपण घरादाराला धरून बसणार काय भजन Lyrics बघितले.

📜📜पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏🙏🙏 !!!!!!

__________________________


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.