Header Ads

सुखी ठेव शंभू माझ्या कुंकवाच्या धनीला Lyrics | ShivShankar Marathi Bhajan



नमस्कार या पोस्टमध्ये आपण सुखी ठेव शंभू माझ्या कुंकवाच्या धनीला Lyrics बघणार आहोत.
___________________

🍁सुखी ठेव शंभू माझ्या कुंकवाच्या धनीला Lyrics🍁

बेल धोतरा वाहीन मी तुझ्या पिंडीला
सुखी ठेव शंभू माझ्या कुंकवाच्या धनीला
शंभू शंभू बोल... || धृ ||

बारा ज्योतिर्लिंगाला मी येईन
तुझ्या नावाचा जप मी करीन
बेल धोतरा वाहिन मी तुझ्या पिंडीला पिंडीला..|| १ ||

दह्या दुधाची आंघोळ घालीन
अभिषेकाची पूजा मी मांडीन
बेल धोतरा वाहिन मी तुझ्या पिंडीला पिंडीला..|| २ ||

सोळा सोमवार उपवास मी करीन
शिवलीलामृत पठण मी करीन
बेल धोतरा वाहिनी मी तुझ्या पिंडीला पिंडीला..|| ३ ||

देव्हाऱ्यात तुला मी पूजीन
चंद्रमौळी रूप मी पाहीन
बेल धोतरा वाहिनी मी तुझ्या पिंडीला पिंडीला..|| ४ ||

रुद्राक्षाच्या माळा मी घालीन
भाळी तुझ्या मी भस्म लावीन
बेल धोतरा वाहिनी मी तुझ्या पिंडीला पिंडीला..|| ५ ||

* * * * *
__________________


✅ही भक्ती गीते पण नक्की वाचा 👇👇👇
___________________


👀आज या पोस्टमध्ये आपण सुखी ठेव शंभू माझ्या कुंकवाच्या धनीला Lyrics बघितले.

📜📜पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏!!!!!!!

___________________


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.