स्वर्गाहून भारी लखाबाईन रचलया वरखेड Lyrics | Lakhabai Song Marathi
नमस्कार या पोस्टमध्ये आपण स्वर्गाहून भारी लखाबाईन रचलया वरखेड Lyrics बघणार आहोत. देवी लखाबाईचा खूप सुंदर असं हे भक्ती गीत आहे.
सॉंग - स्वर्गाहून भारी लखाबाईन रचलया वरखेड
लिरिक्स रोहन कांबळे
सिंगर - आकाश शिंदे
म्युझिक - गौरव रूपवते
___________________________
🎇स्वर्गाहून भारी लखाबाईन रचलया वरखेड Lyrics🎇
लखाबाई राणीची सांगतो कहानी
सांगतो आनंदाने लागली आईची ओढ
स्वर्गाहून भारी लखाबाईन रचलया वरखेड..|| धृ ||
त्रिखंडाच्या होमातून झाला या उद्धार
शिवाच्या डोंगरात मरी आलिया गाड्यावर
येऊन तो गाडा तुटला गावच्या शिवारावर
हनुमंत गडा डाव्या भूजनावर
स्वर्गाहून भारी लखाबाईन रचलया वरखेड..|| १ ||
येऊनी गावात गमरी न्हाली गंगेवर
सजून शिनगारात कशी बसली रेड्यावरी
हो पूजेला ग मान देत आले गावकरी
गावा गावाला मरीची निघालीया फेरी
गाडीवान हाकीतो गाडा निघाला धडधड
स्वर्गाहून भारी लखाबाईन रचलया वरखेड..|| २ ||
पैठण गावाला लागली चाहूल मरीची
राम डोहावरून पालखी निघाली मुंगी पैठणाची
हे खांद्यावर पालखी आरोळी बघा ही भक्तांची..
पोतराज खेळे कोरडा धुन वाजते हलगीची
रोहनाचं लिखाण आकाश गातोया गोड..
स्वर्गाहून भारी लखाबाईन रचलया वरखेड..|| ३ ||
* * * * * * * *
____________________
✅ही भक्ती गीते पण नक्की वाचा👇👇👇👇
____________________
👀आज या पोस्टमध्ये आपण स्वर्गाहून भारी लखाबाईन रचलया वरखेड Lyrics बघितले.
पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏🙏🙏 !!!!!!
____________________
Post a Comment