आई आणि बाप देवा असता घराला काशी आणि पंढरीला जाऊ कशाला Lyrics
नमस्कार या पोस्टमध्ये आपण आई आणि बाप देवा असता घराला काशी आणि पंढरीला जाऊ कशाला Lyrics बघणार आहोत.
_________________________
🌷आई आणि बाप देवा असता घराला काशी आणि पंढरीला जाऊ कशाला Lyrics 🌷
आई आणि बाप देवा असता घराला |
काशी आणि पंढरीला जाऊ कशाला || धृ ||
कुणी जाते काशीला कोणी जाते मथुरेला |
कुणी म्हणे आपण जाऊ जेजुरीच्या खंडोबाला ||
सर्व तीर्थ असता बाई माझ्या घराला |
काशी आणि पंढरीला जाऊ कशाला || १ ||
आई आहे खरोखर लक्ष्मीचा अवतार |
बालपणी हट्ट केले थोर तिचे उपकार ||
सर्व तीर्थशरण जाती तिच्या बाई चरणाला |
काशी आणि पंढरीला जाऊ कशाला || २ ||
आई आणि बाप आहे ज्यांच्या घराला |
तेहतीस कोटी देव आहेत त्यांच्या उशाला ||
भक्त मनोरथ सांगे त्यांच्या जीवाला |
काशी आणि पंढरीला जाऊ कशाला || ३ ||
********
_______________________
✅ही भक्ती गीते पण नक्की वाचा 👇👇👇
_________________________
👀आज या पोस्टमध्ये आपण आई आणि बाप देवा असता घराला काशी आणि पंढरीला जाऊ कशाला Lyrics बघितले.
📜📜पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏🙏🙏 !!!!
_________________________
Post a Comment