Swamini Title Song Lyrics | स्वामिनी टाइटल सॉन्ग | कलर्स मराठी
नमस्कार मित्रानो , या पोस्ट मध्ये आपण Swamini Title Song Lyrics बघणार आहोत. ही सीरियल कलर्स मराठी वर प्रसारित व्हायची. हे गाणं प्रियंका बर्वे यांनी गायलेलं आहे. तर गाण्याचे लिरिक्स अरुण म्हात्रे यांनी लिहिले आहेत .
सॉन्ग - स्वामिनी टाइटल सॉन्ग
सिंगर - प्रियंका बर्वे
लिरिक्स - अरुण म्हात्रे
म्यूज़िक- नीलेश मोहर्रिर
म्युझिक लेबल - कलर्स मराठी
Swamini Title Song Lyrics | Marathi
पाहता तुला मी वरले .... प्रिया रे
जन्म वाहिल्याने घडले .... प्रिया रे
राजस रूप हे गळ्यात माळले
कुंकू कोवळे भाळी लावले
वादळ झेलते मीच सुवासिनी
स्वामी लाभतोअसा युगातुनी
सप्तपदी चालते नभातुनी ......
मी साजते तुझ्याच लोचनात रे
पण जन्मले आधी तुझ्या मनात रे
मग भेटले पुन्हा नवी मलाच रे
मी तर स्वामिनी तुझी प्रिया रे
मी तर स्वामिनी तुझी प्रिया रे
स्वामिनी तुझी प्रिया रे
मी तर स्वामिनी तुझी प्रिया रे .....
शंखनाद हो जीवनी .... पाखडले प्रेम अंगणी ....
सूर्य पुजते मी सखा .... जीव ठेवुनी आचमनी ....
झाले वैराग्य सौभाग्य ह्या मनी
वेगळी मी जगाहून स्वामिनी ...
बुजरी चांदणी सजली आतुनी
चढले उंबरा वय ओलांडूनी
चंद्रच बांधले ह्या सहजीवनी
स्वामी लाभतो असा युगातुनी
सप्तपदी चालते नभातुनी .....
घर हासते मनातल्या मनात रे
नाते रुजे इथे कणाकणात रे
सात जन्म राहू दे हा सहवास रे
मी तर स्वामिनी तुझी प्रिया रे
मी तर स्वामिनी तुझी प्रिया रे
स्वामिनी तुझी प्रिया रे
मी तर स्वामिनी तुझी प्रिया रे .....
हे पण वाचा 👇👇👇
- Unch Maza Zoka Lyrics
- 100 Days Marathi Serial Title Song Lyrics
- Vadalvat Title Song Lyrics
- Mazi Tuzi Reshimgath Lyrics
तर मित्रानो , आज आपण Swamini Title Song Lyrics बघितले . अन्य मराठी गाण्यांच्या लिरिक्स साठी True Marathi Lyrics ला पुन्हा भेट नक्की द्या .
धन्यवाद !!!!!!!!!
Post a Comment