मराठी कविता प्रेमाच्या आठवणी | Marathi Love Poems
नमस्कार मित्रानो , प्रेम आपल्या आयुष्यामधील अतिशय सुखद आणि हळुवार अशी भावना असते. प्रेम झाल्यनानंतर ज्या फीलिंग्स आपण अनुभवतो, ज्या काही गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये घडतात. त्या आठवणी बनून कायमच्या आपल्या हृदयात राहून जातात. आज आपण अश्याच मराठी कविता प्रेमाच्या आठवणी म्हणजेच प्रेमाच्या आठवणी वरील कविता या पोस्टच्या माध्यमातून बघणार आहोत .
मित्रानो " प्रेम "हि खूपच शुद्ध भावना आहे. तुम्ही पण आपल्या आयुष्यामध्ये कधी तरी नक्कीच प्रेमात पडले असाल तर याबद्दल माझं असं माननं आहे कि प्रेम हे फक्त मिळवण्यात किंवा पूर्ण करण्यातच नसते तर खर प्रेम हे दूर राहून सुद्धा नेहमी जिवंत राहत ... कधीच कमी होत नाही किंवा बदलत हि नाही .....
या पोस्ट मध्ये आपण प्रेमाच्या आठवणीवरील काही सुंदर कविता खाली बघणार आहोत . मला खात्री आहे कि या कविता वाचून तुम्हाला आपल्या प्रेमाची आठवण झाल्याशिवाय राहणार नाही ...चला तर मग वळूया कवितांकडे -
1. आठवणींच्या सागरात
आठवणींच्या सागरात मासे कधीच पोहत नाहीत
अमावस्येच्या रात्री चंद्र कधी दिसत नाही
कितीही जगले कुणी कुणासाठी
कुणीच कुणासाठी मरत नाही ......
अनुभव येत असतात प्रत्येक क्षणाला .....
पण नशिबाचे चक्र थांबत नाही
आयुष्यात कितीही प्रेम कराल कुणावर ,
त्याचे मोल सहज कुणाला कळणार नाही
2. आठवणी सारल्या स्वप्नांच्या
आठवणी सारल्या स्वप्नांच्या
देखे आले अवचित कोणी
नजरेत अनोळखी पण
तीच जूनी भासणी वीरानी
उंबरठयावर पाऊल
अडखळले का उगा कळेना
थरथरला प्राजक्त जरासा
खुण माहिती तरी पटेना
रुणझुणले जसे
सरून उरला जरा पुरिया
नको म्हणता बिलगे
तू मिठीची साखरमाया
3. आठवणीत जेव्हा मन वेडं हरवते
आठवणीत जेव्हा मन वेडं हरवते
कोसळणाऱ्या पावसात मग
आसवांना लपवते
न लपलेलं प्रेम आणि न
विसरलेल्या आठवणी
ढगाळलेलं तेच वातावरण
पण कोसळत नाही
आता पुन्हा त्याच
टपोऱ्या थेंबाच्या सरी
वाहत राहतात आता फक्त
त्याच वेड्या आठवणींच्या लहरी
4. आठवणी येतात ....... !!
आठवणी येतात ....... !!
आठवणी बोलतात ...... !!
आठवणी हसवतात ...... !!
आठवणी रडवतात ...... !!
काहीच न बोलता आठवणी
निघूनही जातात .......!!
तरी आयुष्यात शेवटी
आठवणीच राहतात .....
5. वाट पाहशील तर
वाट पाहशील तर आठवण
बनून येईन ,
तुझ्या ओठावर गाणे बनून येईन .....
एकदा मनापासून मला आठवून तर बघ
तुझ्या चेहऱ्यावर गोड हास्य बनून येईन .....😄😃
6. इतकी वर्षे झाली
आता तरी स्वप्नात येऊ नकोस ..
दूर आपण झालो कधीचे .... प्लीज
आठवणीत भेटू नकोस
झालाय ब्रेकअप तरीही ,
डोळ्यांना वाट पाहायला
लावू नकोस
खरच सांगू का तुला ,
माझ्या मनात तू
आता राहू नकोस !!
यायचे आहे तर समोर ये .....
होऊ दे खरी खुरी भेट !!!
वाट पाहणाऱ्या डोळ्यांना दे .....👀
असे छान सुरपरिसें स्ट्रेट ..... !!!
7. तुझ्यासाठी जगलेल्या रात्रींचा
तुझ्यासाठी जगलेल्या रात्रींचा
हिशोब कधीच मांडणार नाही
तू येशील किंवा नाही हट्ट
कधी धरणार नाही
जर नाहीच आलीस तू कधी
तूझ्यासाठी रात्री जगण्याचा
छंद मात्र मी कधीच सोडणार नाही
मी मुळीच सोडणार नाही....😍
8. आठवण येते कधी मला
आठवण येते कधी मला
अन गालावर खुदकन खळी पडते
तर कधी हसता हसता
डोळी माझ्या पाणी आणते
गर्दित राहून सुद्धा ती एकांताचा भास देते
अन एकांतात गेलो तरी मला
नाही कधी एकटे सोडते
डोळे बंद केल्यावरचे
नवे विश्व् दाखवून देते
अन उघड्या डोळ्यांनीही ती
कधी धुंद करून टाकते
दूर लोटायाचा प्रयत्न केला
तर अधिकच जवळ येऊन बसते
जवळ तिला बोलावलं तर मात्र
कोपऱ्यात कुठे दडून बसते
हीच माझी खरी मैत्रीण
नेहमी साथ देणारी
आगंतुक असली तरी
हवी हवीशी वाटणारी
9. किती आठवाव तुला
किती आठवाव तुला
तुझ्या आठवणींच्या समुद्रात बुडून जावं
श्वास माझा संपल्यावर तूच मला वाचवायला यावं
क्षणात तुझा भास होतो
समोर उभी दिसतेस तू
दुसऱ्याच क्षणी स्वप्न भंग पावत
कळत की तिथे नव्हतीसच तू
हात तुझा हातात घेऊन
सांगावास वाटत तुला
किती महत्वाची आहेस तू
आयुष्यात मला
खूप प्रेम करतो तुझ्यावर
पण कस ग सांगू तुला
बोल फक्त एकदा माझ्याशी
खूप काही सांगायचय तुला......
10. तुला सुंदर आठवणीत
तुला सुंदर आठवणीत
अश्रूंचाही पडतो विसर
आठवणीतून परतताना
हा अश्रूच मग साथ देतो
दिवस हि पुरत नाही
तुझी आठवण काढायला
तुला हि जमत का ग
माझ्या आठवणीत रमायला
11. गोड आनंदी आहेत
गोड आनंदी आहेत
सहज हळुवार भावना आहेत
हळुवार भावना आहेत
मन अतुट प्रेम आहे
संपूर्ण अतुट प्रेम आहे
आता तू आहेस........
12. सांजवेळी येणारी तुझी स्वपन
सांजवेळी येणारी तुझी स्वपन
रात्री डोळ्यांना ओलावून जातात
आठवणींच्या कवेत तूझ्या
मनसही वेडावुन जातात
अलगद सारे क्षण मग
नजरे समोर
पहिल्या भेटीची आठवण
हळूच करून जातात
भेटायला आता आतुर होते मन
परत गाठ आपली पडेल का रे पण ??????
13. हो आजही तुझी आठवण येते
हो आजही तुझी आठवण येते
जेव्हा पावसाच्या सारी हळुवारपणे खाली येतात
तुझ्याबरोबर हातात हात घालून चालणे आठवते
आजही कधी कधी मी गर्दीत हरवतो ... वाट बघतो ....
तू येऊन मला रस्ता दाखवशील ......
एक वेळ अशी होती जेव्हा एकटे राहून प
ण एकटेपणा वाटत नव्हता
पण आता तर गर्दीत राहून पण एकटेपणा जाणवतो
हो मला आज आठवते कि कश्या प्रकारे
गरबा खेळताना आपली ताटातूट
अनोळखी चेहरवर भीती दाटून आली होती
मी मागे उभा राहून मजा बघत होतो पण
आज मला त्यामागचं कारण समजतंय
आपण गेलो होतो त्या सगळ्या जागा
आता निर्जीव वाटतात
फ्लाय ओव्हर वरचे
गाण्याचे बोल पण आता ऐकू येत नाही
हो आजही मला तुझी आठवण येते ..........
हे पण वाचा 👇👇👇
- प्रेम कविता चारोळ्या
- Marathi Propose Kavita
- Romantic Marathi Premachya Kavita
- Marathi Pavsachi Kavita
- Bap Kavita In Marathi
तर मित्रानो या पोस्ट मध्ये आपण मराठी कविता प्रेमाच्या आठवणी वर १3 कविता बघितल्या . तुम्हाला या कविता कश्या वाटल्या ते मला कंमेंट मध्ये नक्की सांगा आणि अन्य मराठी पोस्ट साठी True Marathi Lyrics ला पुन्हा भेट नक्की द्या .
धन्यवाद !!!!!!!!!
Post a Comment