Header Ads

Shiv Raksha Stotra Lyrics | शिव रक्षा स्तोत्र


नमस्कार मित्रानो , हिंदू धर्मामध्ये शिवाच्या पूजा भक्तीला विशेष महत्व आहे. भगवान महादेवांना भोलेनाथ असेही म्हणतात कारण ते लवकर प्रसन्न होणारे देवता आहेत. सोमवार हा दिवस महादेवांना समर्पित आहे. या दिवशी शिवाची पूजा, अर्चा व्रत केले जातात. या दिवशी शिवाची पूजा, उपवास केल्याने त्यांची कृपा प्राप्त होते असे मानले जाते. शिवाची कृपा प्राप्त होण्यासाठी तुम्ही शिव रक्षा स्तोत्राचा पाठ जरूर केला पाहिजे. या पोस्ट मध्ये आपण Shiv Raksha Stotra Lyrics बघणार आहोत.

    Shiv Raksha Stotra Lyrics


    काय आहे शिव रक्षा स्तोत्र ??📕📕


    शिव रक्षा स्तोत्र म्हणजे आपल्या रक्षणासाठी भगवान् शिव यांच्याकडे केलेली प्रार्थना आहे. असे मानले जाते की, या स्त्रोत्राची रचना याज्ञवल्क्य ऋषि यानी केली जे भगवान् शिवाचे भक्त होते . असे बोलले जाते कि भगवान् नारायणानी याज्ञवल्क्य ऋषींच्या स्वप्नामध्ये येऊन या स्रोत्राचे वर्णन केले होते .

    भगवान् शिव ज्याना सृष्टीचा निर्माता मानतात . या स्त्रोत्रचि सुरवात शिवाच्या प्रशंसा आणि वंदनाने सुरु होते . यानंतर स्रोत्रामध्ये भक्त आपल्याला सुरक्षा आणि आशीर्वाद मागतात . पुढे यामध्ये भगवान् शिवाच्या महिमेचे वर्णन केलेले आहे . आपली आणि आपल्या परिवाराला दुखापासून दूर ठेवण्यासाठी , दरिद्रता आणि गरीबी , अपमृत्युपासून रक्षण व्हावे यासाठी शिव रक्षा स्रोत्राचा पाठ दररोज पूर्ण भक्तिभावाने करावा . दररोज करने शक्य नसल्यास दर सोमवारी तरी याचा पाठ जरूर करावा . चला तर मग बघुया Shiv Raksha Stotra Lyrics -


    Shiv Raksha Stotra Lyrics


    विनियोग-ॐ अस्य श्री शिवरक्षास्तोत्रमंत्रस्य याज्ञवल्क्यऋषिः, श्री सदाशिवो देवता, अनुष्टुपछन्दः श्री सदाशिवप्रीत्यर्थं शिव रक्षा स्तोत्रजपे विनियोगः।

    चरितम् देवदेवस्य महादेवस्य पावनम् ।
    अपारम् परमोदारम् चतुर्वर्गस्य साधनम् ।1।

    गौरी विनायाकोपेतम् पंचवक्त्रं त्रिनेत्रकम् ।
    शिवम् ध्यात्वा दशभुजम् शिवरक्षां पठेन्नरः।2।

    गंगाधरः शिरः पातु भालमर्धेन्दु शेखरः।
    नयने मदनध्वंसी कर्णौ सर्पविभूषणः ।3।

    घ्राणं पातु पुरारातिर्मुखं पातु जगत्पतिः ।
    जिह्वां वागीश्वरः पातु कन्धरां शितिकन्धरः ।4।

    श्रीकण्ठः पातु मे कण्ठं स्कन्धौ विश्वधुरन्धरः ।
    भुजौ भूभार संहर्ता करौ पातु पिनाकधृक् ।5।

    हृदयं शङ्करः पातु जठरं गिरिजापतिः।
    नाभिं मृत्युञ्जयः पातु कटी व्याघ्रजिनाम्बरः ।6।

    सक्थिनी पातु दीनार्तशरणागत वत्सलः।
    उरु महेश्वरः पातु जानुनी जगदीश्वरः ।7।

    जङ्घे पातु जगत्कर्ता गुल्फौ पातु गणाधिपः ।
    चरणौ करुणासिन्धुः सर्वाङ्गानि सदाशिवः ।8।

    एताम् शिवबलोपेताम् रक्षां यः सुकृती पठेत्।
    स भुक्त्वा सकलान् कामान् शिवसायुज्यमाप्नुयात्।9।

    गृहभूत पिशाचाश्चाद्यास्त्रैलोक्ये विचरन्ति ये।
    दूराद् आशु पलायन्ते शिवनामाभिरक्षणात्।10।

    अभयम् कर नामेदं कवचं पार्वतीपतेः ।
    भक्त्या बिभर्ति यः कण्ठे तस्य वश्यं जगत्त्रयम् ।11।

    इमां नारायणः स्वप्ने शिवरक्षां यथाऽदिशत् ।
    प्रातरुत्थाय योगीन्द्रो याज्ञवल्क्यस्तथाऽलिखत्  ।12।

    । इति श्री शिवरक्षास्तोत्रं सम्पूर्णम ।


    शिव रक्षा स्रोत्राचे फायदे कोणतेआहेत ??✅✅


    • शिव रक्षा स्तोत्र आणि कोणत्याही दुसऱ्या देवाचे स्तोत्र मनोभावे पठन केल्याने मनातले नेगेटिव विचार दूर होऊन मन शुद्ध आणि पावरफुल विचारांनी भरून जाते . तसेच आसपास चे वातावरण पण सकारात्मक बनते.
    • या स्तोत्राचा पाठ केल्याने भगवान शिवांच्या कृपेने शत्रूंपासून , रोगांपासून तसेच वाईट गोष्टींपासून रक्षण होते.
    • शिव रक्षा स्तोत्राच्यापाठाने व्यक्तीची धार्मिकता वाढते आणि अध्यात्मिक विकास होण्यास सुरवात होते. याच्या जपाने मन शुद्ध होऊन शांतीची अनुभूती होते.
    • सोमवारच्या दिवशी या स्तोत्राचा पाठ केल्याने आत्मविश्वास वाढतो असे मानले जाते.मानसिक शांति आणि आतंरिक शांति ची प्राप्ति होते .जीवनातील प्रोब्लेम्स आणि दुःख दूर करण्यास मदद करते .
    • याचा पाठ केल्याने मनाची एकाग्रता वाढण्यास मदद होते .हे स्तोत्र जन्म आणि मृत्यु याच्या चक्रमाधुन मुक्त करते .
    • या स्तोत्राचा पाठ केल्याने नाकारत्मकता दूर होते आणि जीवनात सुख शांती मिळते.


    हे पण वाचा 👇👇👇


    तर मित्रानो आज आपण शिव रक्षा स्तोत्राबद्दल माहिती , फायदे आणि Shiv Raksh a Stotra Lyrics बघितले . या पोस्ट मध्ये आपण बघितले कि भगवान शिवाची कृपा प्रपात करण्यासाठी अतिशय प्रभावशाली असे हे स्तोत्र आहे. तुम्हीसुद्धा याचा पाठ करून आपले जीवन सुखकर बनवा आणि अन्य भक्ति सम्बंधित पोस्ट साठी True Marathi Lyrics ला पुन्हा भेट नक्की दया .

    धन्यवाद 🙏🙏🙏🙏





    कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

    Blogger द्वारे प्रायोजित.