भांडून म्हाळसा देवाला म्हणते Bhaktigeet Lyrics | Khandoba Bhaktigeet
नमस्कार या पोस्टमध्ये आपण भांडून म्हाळसा देवाला म्हणते Bhaktigeet Lyrics बघणार आहोत.
__________________
🌺भांडून म्हाळसा देवाला म्हणते Bhaktigeet Lyrics🌺
भांडून म्हाळसा देवाला म्हणते
उत्तर द्या इथं बसून
भांडून म्हाळसा देवाला म्हणते
उत्तर द्या इथं बसून
सवत मला का आणली सांगा
मी लग्नाची असून
सवत मला का आणली सांगा
मी लग्नाची असून...|| धृ ||
तिच्या परास उजवीस हाय मी
रूपान देखणी, हीच एक का
तुम्हा वाटली शुक्राची चांदणी
सोन्या वाणी संसार माझा
मोडता का तुम्ही हसून ?
सवत मला का आणली सांगा
मी लग्नाची असून...|| १ ||
घटकाभर बी राहणार नाही
मी तुमच्या या दाराला
खुशाल मज्जा करा इथं
तुम्ही जाते मी माहेराला
तुमचं माझं नातं तुटलय
सांगतेय आज पासून
सवत मला का आणली सांगा
मी लग्नाची असून...|| २ ||
कळलं नाही का तिला बी आधी
ती पण असली कसली
जना मनाची सोडून बाई
खुशाल की घर घुसली
दोनचली ही करी लावली
माझ्याच घरात घुसून
सवत मला का आणली सांगा
मी लग्नाची असून...|| ३ ||
दोघींच्या भांडणाला देवानं
उत्तम उपाय केला
माथ्याचा गड म्हाळसाला दिला
पायथ्याचा बानूला..
दोघी सवती वायल्या राहता
भांडण गेलं मिटून...
सवत मला का आणली सांगा
मी लग्नाची असून...|| ४ ||
__________________
✅ ही गीते पण नक्की वाचा👇👇👇
- मल्हारी पिवळा झाला हळद लागली Lyrics
- धनगराची बानू दिसे गोरी गोरी पान Lyrics
- खंडोबाची गाणी Lyrics
- खंडोबाची कारभारीण झाली
- खंडेरायाच्या लग्नाला बानू नवरी नटली लिरिक्स
__________________
📜📝पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏!!!!!
__________________
Post a Comment