Header Ads

धनगराची बानू दिसे गोरी गोरी पान Lyrics | Dhangarachi Banu Dise Gori Gori Pan



नमस्कार या पोस्टमध्ये आपण धनगराची बानू दिसे गोरी गोरी पान Lyrics बघणार आहोत. आनंद शिंदे यांनी हे गीत गायलेल आहे.


सॉंग - धनगराची बानू दिसे गोरी गोरी पान
लिरिक्स/ सिंगर /म्युझिक - छगन चौगुले
म्युझिक लेबल - विंग्स म्युझिक


धनगराची बानू दिसे गोरी गोरी पान Lyrics | Marathi

धनगराची बानू दिसे गोरी गोरी पान
हरपल मल्हारीच सार देहभान || धृ ||

बानुच्या नादान देव चंदनपुरी गेला
बानूला पाहून माझा देव वेडा झाला
न्याहाळीतो लावण्य अति रूपवान
हरपल मल्हारीच सार देहभान || १ ||

बानू बाईच्या तो शेळ्या मेंढ्या चारी
बानुचा चाकर झाला तो मल्हारी
उन्हामध्ये फिरतोय सारं माळ रान
हरपल मल्हारीच सार देहभान || २ ||

शेळ्या मेंढ्या धुतोया लावूनीया जोर
आपटून मेंढ्या मारील्या खडकावर
मुक्या जीवाचं त्यान केलं बलिदान
हरपल मल्हारीच सार देहभान || ३ ||

त्याग केला बांधून शेळ्या मेंढ्यांसाठी
लग्नासाठी मल्हारी बानू बाई पाठी
करीन जिवंत मेंढ्या देईन जीवदान
हरपल मल्हारीच सार देहभान || ४ ||

उचेकरा मल्हारी च्या भक्तीची आवड
गोड मुखान भक्त गाई गाणं गोड गोड
देवाला देतो भंडाऱ्याचा मान
हरपल मल्हारीच सार देहभान || ५ ||

* * * * *




हे अभंग पण नक्की वाचा 👇👇👇👇



आज या पोस्टमध्ये आपण धनगराची बानू दिसे गोरी गोरी पान Lyrics बघितले.

पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद !!!!!!!!!! 🙏🙏🙏🙏


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.