खंडोबाची गाणी Lyrics | Khandobachi Gani Lyrics Marathi
नमस्कार, स्वागत आहे तुमचं True Marathi Lyrics वर आज या पोस्ट मध्ये आपण खंडोबाची गाणी Lyrics मराठी मधून बघणार आहोत.
🙏🙏खंडोबाची गाणी Lyrics🙏🙏
खंडोबा राजा मल्हारी माझा निघाला थाटात
|| येळकोट येळकोट जय मल्हार
सदानंदाचा विजय असो ||
खंडोबा राजा मल्हारी निघाला थाटात ..(2 times)
निघाला थाटात खंडोबा चंदनपुरात ..(2 times)
मल्लू देव घोड्यावरी, सोडली त्यांन ही जेजुरी ..(2 times)
लागेना ध्यान सोडील ठाण बानु मनात ..(2 times)
बानु मनात, खंडोबा चंदनपुरात ..(2 times)
निघाला थाटात खंडोबा चंदनपुरात ..(2 times) ||धृ||
वेडा झाला बानुसाठी, गाव घेई प्रेमापोटी ..(2 times)
बानुच्या दारात धनगर वाड्यात मेंढ्या राखत ..(2 times)
मेंढ्या राखत, खंडोबा चंदनपुरात ..(2 times)
निघाला थाटात खंडोबा चंदनपुरात ..(2 times) || १ ||
भंडारा लावी भाळावरी, खंडोबा तो शिव मल्हारी ..(2 times)
पटली खूण जडलं मन, धनगर रूपात ..(2 times)
धनगर रूपात, खंडोबा चंदनपुरात ..(2 times)
निघाला थाटात खंडोबा चंदनपुरात ..(2 times) || २ ||
उमा पार्वती बानू माझी, देवासाठी झाली राजी ..(2 times)
कथा देवाची खंडेरायाची गाजते जगात ..(2 times)
गाजते जगात, खंडोबा चंदनपुरात ..(2 times)
निघाला थाटात खंडोबा चंदनपुरात ..(2 times) || ३ ||
खंडोबा राजा, मल्हारी राजा निघाला थाटात
निघाला थाटात खंडोबा चंदनपुरात ...
❖ ❖ ❖ ❖
खंडोबाची मूर्ती मनात भरली ग
सुंदर दिसली, डोळ्यात खचली, खायची खरली गं ..(2 times)
खंडोबाची ही मूर्ती माझ्या मनात भरली गं ..(2 times)
भेट शोभे डोईवर, कास पिवळा पितांबर ..(2 times)
घोड्यावर ऐटदार मूर्ती शोभली ग ..(2 times)
खंडोबाची मूर्ती माझ्या मनात भरली गं ..(2 times) || धृ||
रवी भंडारा तो काळा, भार नवरत्नांचा गळा ..(2 times)
त्रिशूल डमरू खडग त्यांनं हाती धरली ग ..(2 times)
खंडोबाची ही मूर्ती माझ्या मनात भरली ग ..(2 times) ||१ ||
हा क्षेत्र पालकाशीचा, अवतार शिव शंभूचा ..(2 times)
दुष्ट दुर्जन मारून जनता सुखात ठेवली गं ..(2 times)
खंडोबाची मूर्ती माझ्या मनात भरली गं ..(2 times) || २ ||
हा नव खंडांचा राजा, देव मल्हारी गं माझा,
देव मल्हारी माझा ..(2 times)
त्यांनाच मजवर आईबापाची माया लावली गं ..(2 times)
खंडोबाची मूर्ती माझ्या मनात भरली गं ..(2 times) || ३ ||
सुंदर दिसली, डोळ्यात खचली, खायची खरली गं ..(2 times)
खंडोबाची ही मूर्ती माझ्या मनात भरली गं ..(2 times)
❖ ❖ ❖ ❖
आला आला राजा
आला आला राजा अन खंडोबा तो माझा
चाले पालखीचा सोहळा,
भक्त भंडाऱ्यात करितो चाल... (2 times) ||धृ ||
आंघोळीच्या साठी निघे खंडोबा
अन करेच्या तीरी देव राही उभा
पुढे ढोल ताशे आणि चौघडा
पुणे वरखडे खोबऱ्याचा सडा
भक्त उडवीत आले धमाल
भक्त भंडार्यात करितो चाल .. (2 times) || १ ||
तुझी धन्य पावन ही जेजुरी
तू संकट निवारी, तू कल्याणकारी
तुझ्यावरती भक्तांची श्रद्धा खरी
तुझे रुप देवा असे अंतरी
साऱ्या भक्तांचा तू फक्त मान
भक्त भंडाऱ्यात करितो चाल ... (2 times) || २ ||
तुझ्या जेजुरीलाही गर्दी अफाट
असा खंडोबाचा उत्सव विराट
त्या सोमवतीलाही भक्तीची लाट
ती घेऊन होती भक्तीची पहाट
साऱ्या भाविकांना ठेवी खूशात
भक्त भंडाऱ्यात करितो चाल ... (2 times) || ३ ||
आला आला राजा अन खंडोबा तो माझा
चाले पालखीचा सोहळा,
भक्त भंडाऱ्यात करितो चाल. ... (5 times)
❖ ❖ ❖ ❖
पिवळा पिवळा भंडारा
पिवळा पिवळा भंडारा लावू या देवाला
हे पिवळा पिवळा भंडारा लावूया देवाला
माझ्या खंडेरायाला माझ्या खंडेरायाला
देव माझा घोड्यावर स्वार,
देव माझा मार्कंड मल्हार
तर त्यांना करतो ठार बनून रुद्रावतार
येळकोट येळकोट जय मल्हार गायाला
माझ्या खंडेरायाला, माझ्या खंडेरायाला
पिवळा पिवळा भंडारा लावू या देवाला
हे पिवळा पिवळा भंडारा लावूया देवाला
माझ्या खंडेरायाला माझ्या खंडेरायाला
माया त्याची भक्तांवर
ठान असे कडेपठार
सत्वाचा खंडोबा खरं, जीवाला वाटेल बरं
बानू म्हाळसा बसल्यास देवाच्या बाजूला
हे, बानू म्हाळसा बसल्यास देवाच्या बाजूला
पिवळा पिवळा भंडारा लावू या देवाला
हे पिवळा पिवळा भंडारा लावूया देवाला
माझ्या खंडेरायाला माझ्या खंडेरायाला
❖ ❖ ❖ ❖
दिनांचा राजा, देव हा माझा
दिनांचा राजा देव हा माझा
भोळा शिव मल्हारी
दिनांचा राजा देव हा माझा
भोळा शिव मल्हारी
स्वार होऊन घोड्यावरी
न जातोय बानुच्या घरी
देव मल्हारी माझा, आहे जेजुरीचा राजा
देव मल्हारी माझा, आहे जेजुरीचा राजा
स्वार होऊन घोड्यावरी
न जातोय बानुच्या घरी
❖ ❖ ❖ ❖
सखे चल चल जेजुरी जाऊ
सखे चल चल जेजुरी जाऊ
खंडेरायाचे दर्शन घेऊ
सखे चल चल जेजुरी जाऊ
खंडेरायाचे दर्शन घेऊ
रविवार उपवास धरू
करा गंगेत आंघोळ करू
रविवार उपवास धरू
करा गंगेत आंघोळ करू
सखे चल चल जेजुरी जाऊ
खंडेरायाचे दर्शन घेऊ
❖ ❖ ❖ ❖
आठा दिसा इतवारी
आठा दिसा इतवारी
दिवा लाविते लोण्याचा
बाई जेजुरीचा राजा
माझ्या देव्हारी सोन्याचा
देवा केली तुझी भक्ती
भाव मनात धरून
नको प्रपंच हा लटका
मला न्यावं उद्धारून
शरणी जागा द्यावी मजला
मजला नाही आसरा कोणाचा
देवा केली तुझी आरती
पंचप्राणाच्या ज्योती
जीवे भावे ओवाळती,
माझ्या खंडोबाची मूर्ती
लाभ घडो वेळो वेळा
देवा तुझ्या दर्शनाचा
बाई जेजुरीचा राजा
माझ्या देव्हारी सोन्याचा
पिवळ्या भंडार्याच लेण, गुण गाईलं आवडीनं
देवा तुझ्या दर्शनान,
विघ्न जातील निरसून
भक्त तुझा नामदेव, छंद लागला गाण्याचा
बाई जेजुरीचा राजा
माझ्या देव्हारी सोन्याचा
आठा दिसा इतवारी
बाई जेजुरीचा राजा
❖ ❖ ❖ ❖
बानू बाईंची मेंढरा वरी
सोन्याची जेजुरी तिथं नांदतो मल्हारी
सोन्याची जेजुरी तिथं नांदतो मल्हारी
भक्ती प्रेमासाठी भुलला
बानू बाई ची मेंढरावरी तो
चंदनपुरी देव धनगर झाला
बानू बाई ची मेंढरावरी तो
चंदनपुरी देव धनगर झाला
बाई भाव हो कुणाला काय इपरीत झालं
शोधी म्हाळसा देवाला देव नाही महालाला
बाई भाव हो कुणाला काय इपरीत झालं
शोधी म्हाळसा देवाला देव नाही महालाला
म्हाळसा होती अंतर्ज्ञानी, तिच्या आल्या सर्व ध्यानी
म्हाळसा होती अंतर्ज्ञानी, तिच्या आल्या सर्व ध्यानी
दिल म्हातारपण देवाला ....
बानू बाई ची मेंढरावरी तो
चंदनपुरी देव धनगर झाला
बानू बाई ची मेंढरावरी तो
चंदनपुरी देव धनगर झाला
बारा वर्षे बानू घरी देव करीत चाकरी
मिरची कांद्याची शिदोरी खाई आवडीने मल्हारी
बारा वर्षे बानू घरी देव करीत चाकरी
मिरची कांद्याची शिदोरी खाई आवडीने मल्हारी
दिल वचन बानाईला, घेऊन घोड्यावर निघाला
दिल वचन बानाईला, घेऊन घोड्यावर निघाला
लगीन करून आला जेजुरीला
बानू बाई ची मेंढरावरी तो
चंदनपुरी देव धनगर झाला
बानू बाई ची मेंढरावरी तो
चंदनपुरी देव धनगर झाला
अशी मेंढरांची जात, देव हिंडतो जंगलात
दगडावर धुवीत मेंढरं उन्हात सुकवीत
अशी मेंढरांची जात, देव हिंडतो जंगलात
दगडावर धुवीत मेंढरं उन्हात सुकवीत
दिले मेंढराला जीवदान दिसे सारा चमत्कार
दिले मेंढराला जीवदान दिसे सारा चमत्कार
बानू वळखिते देवाला
बानू बाई ची मेंढरावरी तो
चंदनपुरी देव धनगर झाला
बानू बाई ची मेंढरावरी तो
चंदनपुरी देव धनगर झाला
सोन्याची जेजुरी तिथं नांदतो मल्हारी
भक्ती प्रेमासाठी भुलला
बानू बाई ची मेंढरावरी तो
चंदनपुरी देव धनगर झाला
बानू बाई ची मेंढरावरी तो
चंदनपुरी देव धनगर झाला
❖ ❖ ❖ ❖
हे पण नक्की वाचा 👇👇👇
तर आज आपण खंडोबाची गाणी Lyrics बघितले अधिक भक्ती संबंधित पोस्ट वाचण्यासाठी True Marathi Lyrics ला पुन्हा भेट द्यायला विसरू नका. पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद !!!!! 🙏🙏🙏
Post a Comment