-->

Header Ads

माझ्या शेगावीचा राया भक्ती गीत Lyrics | Majhya Shegavicha Raya



नमस्कार या पोस्टमध्ये आपण माझ्या शेगावीचा राया भक्ती गीत Lyrics बघणार आहोत.

__________________

माझ्या शेगावीचा राया भक्ती गीत Lyrics 🌸

गजानना तुझ्या महिमेचा
घुमतो कानी नाद रं
तूच आम्हा भक्ता
दिली शेगावीची वाट रं
घेता नाव तुझे देवा
मिटते तहान रं
आम्हा भोळ्या भक्तांसाठी
तूच माय बाप रं

मन दंगल भक्तीत
आस डोळ्यांमधी दाटे
वाटचालता शेगावीची
माझं पांग सार फिटे
डोळे मिटता दिसे
फक्त तुझी छत्रछाया
धन्य झालो दर्शनाने
नित्य राहो तुझी माया
माझ्या शेगावीच्या राया... (*३)

डोळे घेऊन ये तुळस देवा
येथे तुझ्या दारी
ओव्या मुखातून गाऊन
भावी शेगावीची वारी
सोबती घेऊन शिदोरी

त्यात भक्तीचाही स्वाद
कानी लेकरांच्या घुमे
टाळ मृदंगाचा नाद
अशी नित्य राहो देवा
तुझी प्रेमळ छाया...
माझ्या शेगावीच्या राया... (*३)

_________________


✅ ही गीते पण नक्की वाचा👇👇👇

__________________


👀तर आज या पोस्टमध्ये आपण माझ्या शेगावीचा राया भक्ती गीत Lyrics बघितली.

📜📝पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏!!!!!

__________________


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.

📑 Table of Contents