लेक तुळस वृंदावन Lyrics 👩Lek Tulas Vrundavan Lyrics
नमस्कार या पोस्टमध्ये आपण लेक तुळस वृंदावन Lyrics बघणार आहोत.
सॉंग लेक तुळस वृंदावन
लिरिक्स / सिंगर - श्री मंगेश आंबेकर
म्युझिक - शाहीर विकास लंबोरे संदीप पालेकर
__________________
👩लेक तुळस वृंदावन Lyrics 👧
लेक सुखाचं वृंदावन
लेक तुळस वृंदावन
लेक टिपूरात चांदणं
लेक गारव्याचं चांदण || धृ ||
घरादाराचं हसणं
हीच घरामधी असण
जणू आईचा सहवास
तिचं बाजूला बसणं
लेक घराचं या अंदण
लेक बरकतीच आंदणं
लेक नशीबाचा हे दान
लेक विश्वाचा तारांगण || १ ||
ती नसते घरात जेव्हा
घर होतं सारं सुनं
लेक घराचं या घरपण
लेक मायेचं आपलेपण
लेक संकटी निरूपण
सांजवाती निरंजन
लोक उत्सव सोहळे
लेक बावनकशी सोनं || २ ||
जीव अवघ्यांना लावून
होते परक्या घरचा धन
कोणी भेटेल का हो सांगा
असं जगामध्ये शोधून ?
कसा येतो तिच्यात
असा आई बहिणीचा तो गुण
लेकी वाणी नाही दुजे
न सांगता पारखी मन || ३ ||
__________________
✅ ही गीते पण नक्की वाचा👇👇👇
__________________
👀तर आज या पोस्टमध्ये आपण लेक तुळस वृंदावन Lyrics बघितली.
📜📝पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏!!!!!
__________________
Post a Comment