गण गण गणात बोते बाबा गजानन म्हणत होते भजन Lyrics
🙏🙏🙏नमस्कार या पोस्ट मध्ये आपण गण गण गणात बोते बाबा गजानन म्हणत होते भजन Lyrics बघणार आहोत.
_____________________
🌷गण गण गणात बोते बाबा गजानन म्हणत होते भजन Lyrics🌷
जीव माझा तिथे रमला ना
गण गण गणात बोते
बाबा गजानन म्हणत होते
भजनी भजनी भजनी...
जीव माझा तिथे रमला ना... || धृ ||
दर गुरुवारी जाऊ सखे जोडीन
गजाननाला पुजू आळीपाळीन
पुष्पमालांच्या अर्पण माला
भक्तजनांना पावन झाला
झाला झाला झाला....
जीव माझा तिथे रमला ना... || 1 ||
शेगावीच्या वाटे जाऊ दर्शना
जाऊन करूया त्यांची वंदना
गरुड खांबाला मारू फेरी
एकादशीला करू वारी
वारी वारी वारी....
जीव माझा तिथे रमला ना... || 2 ||
पालखीमध्ये चाले गुरु माऊली
या दिंडीमध्ये खेळू थोडी पाऊली
प्रगट दिनाचा सोहळा बघण्या
पूर्ण होतील मनोकामना
चल ना चल ना चल ना....
जीव माझा तिथे रमला ना... || 3 ||
* * * * * *
_____________________
✅ही भक्ती गीते पण नक्की वाचा👇👇👇
- आठव रे गजाननाला हा भवसागर तरण्याला Lyrics
- घडी घडी मला आठवण होते गजाननाची फार Lyrics
- तुळस बाई तुम्ही का हिंडता रानात Lyrics
_____________________
👀आज या पोस्ट मध्ये आपण गण गण गणात बोते बाबा गजानन म्हणत होते भजन Lyrics बघितले
📜📜पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद !!!!!!!!
_____________________
Post a Comment