Header Ads

अलख निरंजन आदेश Song Lyrics | Alakh Niranjan Adesh



नमस्कार या पोस्ट मध्ये आपण अलख निरंजन आदेश Song Lyrics बघणार आहोत.


सॉंग - अलख निरंजन आदेश
लिरिक्स - कार्तिक दिनकर
सिंगर - आकाश शिंदे
म्युझिक - गौरव रूपवते


____________________

🌹 अलख निरंजन आदेश Song Lyrics 🌹

हातात चिमटा काखेत झोळी
घालून भगवा वेष..
दारी आलाया बाबा दिला या माझा
अलख निरंजन आदेश.... || धृ ||

कानी कुंडल त्रिशूल कमांडल शोभतय हाती
अंगी जानवं बांधून शैली शिंगी आहे बेंबी वरती
नवनाथ वाचूनी गाथा रुढीचा घ्या उपदेश
दारी आलाया बाबा दिला या माझा
अलख निरंजन आदेश.... || १ ||

येऊन दारी हाका मारी भिक्षा वाढ माई
सदा नाथांची कृपादृष्टी तुझ्या घरादारावर राही
आले हो दारी चमत्कारी घेऊन गोसावी भेस
दारी आलाया बाबा दिला या माझा
अलख निरंजन आदेश.... || २ ||

नाथांच्या जन्माने झाली पावन ही धरती
आज ही त्यांची छाया आहे बघा साऱ्या विश्वावरती
आकाश कार्तिकाच्या नशिबाची बदलली त्यांनी रेघ
दारी आलाया बाबा दिला या माझा
अलख निरंजन आदेश.... || ३ ||

* * * * * *
_________________


✅हे भक्ती गीते पण नक्की वाचा 👇👇👇
________________________


👀आज या पोस्टमध्ये आपण अलख निरंजन आदेश Song Lyrics बघितले.

📜📜पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏🙏🙏 !!!!!

__________________________

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.