भक्तासाठी काळभैरी म्हस्कोबा झाला Lyrics | Bhaktasathi Kalbhairi Mhaskoba Jhala
सॉंग - भक्तासाठी काळभैरी म्हस्कोबा झाला
सिंगर /लिरिक्स - बाळू शिंदे
म्युझिक - बाळू शिंदे
म्युझिक लेबल - टी ट्रॅक स्टुडिओ
________________________
🌹भक्तासाठी काळभैरी म्हस्कोबा झाला Lyrics🌹
सोडून सोन्याची सोनारी आला विराला
भक्तासाठी काळभैरी म्हस्कोबा झाला || धृ ||
करी कमळाजी मनोभावे सेवा
सोडूनी आला सोनेरी गाव
आला वाडा पोरबना गावा
डोळे मिटूनी करितो धावा
ओंजळीने पाणी घाली
सोनार सिद्धाला
करवडाची फुले वाही नाथ बाबाला
भक्तासाठी काळभैरी म्हस्कोबा झाला || १ ||
पुजाऱ्याला हो संशय आला
बसले कमळाजीस मारण्याला
देव कमळाजीशी बोलता झाला
येऊ नको रे माझ्या पूजेला
जिवे मारतील असे गुरव तुजला
मीच येतो आता रे तुझ्या वाड्याला
भक्तासाठी काळभैरी म्हस्कोबा झाला || २ ||
तरी कमळाची नाथाचा धावा
तुझ्या पूजेचा खंड न व्हावा
झाला जर का हिवर हिरवा
मी आल्याचा तोच पुरावा
वाट पाहून या कमळाची थकला
शीर कमळ अर्पिण्याचा विचार केला
भक्तासाठी काळभैरी म्हस्कोबा झाला || ३ ||
पोरबनाला चमत्कार झाला
पालवी फुटली त्या हिवराला
तरी परपात नाथ आला
पिऊ लागला दूध कपिलेला
श्री नाथाला पाहुनी आनंद झाला
सोनार तिथं आले पोरबनाला
भक्तासाठी काळभैरी म्हस्कोबा झाला || ४ ||
* * * * * *
________________________
✅ ही भक्ती गीते पण नक्की वाचा 👇👇👇
आज या पोस्टमध्ये आपण भक्तासाठी काळभैरी म्हस्कोबा झाला Lyrics बघितले.
📜📜पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद !!!!!!!
________________________
आज या पोस्टमध्ये आपण भक्तासाठी काळभैरी म्हस्कोबा झाला Lyrics बघितले.
📜📜पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद !!!!!!!
________________________
Post a Comment