Header Ads

गण गण गणात बोते गाऊ बाबाचे भजन Lyrics | Gajanan Maharaj Bhajan



🙏🙏🙏नमस्कार या पोस्टमध्ये आपण गण गण गणात बोते गाऊ बाबाचे भजन Lyrics बघणार आहोत.
__________________

गण गण गणात बोते गाऊ बाबाचे भजन Lyrics

भजन करण्यासाठी नको पाहू कुणाचा मान
गण गण गणात बोते गाऊ बाबा चे भजन... || धृ ||

भावभक्ती मनामध्ये नेहमी असावी
दुष्ट दुर्जनाची संगती नसावी
अशा भक्तासाठी उभा असे बाबा गजानन
गण गण गणात बोते गाऊ बाबा चे भजन. .. || 1 ||

नको मला मान नको मला दान
नको पैसा अडका नको चांदी सोनं
तनमन ध्यान लावूनी घ्यावे गजानन बाबाचे नाम
गण गण गणात बोते गाऊ बाबा चे भजन. .. || 2 ||

संत तुकडोजी राष्ट्रसंत झाले
खंजरीचे भजन त्यांनी जगी अर्पण केले
अशा भक्तांवर कृपा गजानन बाबाची महान
गण गण गणात बोते गाऊ बाबा चे भजन. .. || 3 ||

भजन करण्यासाठी नको पाहू कुणाचा मान
गण गण गणात बोते गाऊ बाबा चे भजन... ||

* * * * * *
____________

✅ हे भक्तीगीत पण नक्की वाचा👇👇👇
__________________

👀आज या पोस्ट मध्ये आपण गण गण गणात बोते गाऊ बाबाचे भजन Lyrics बघितले .

📜📜पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏🙏🙏 !!!!!!!!!
__________________



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.