Header Ads

पार्वतीचा नाथ त्रिभुवनात भक्तांचा कैवारी झाला Lyrics | Shiv Shankar Bhaktigeet



🙏🙏🙏नमस्कार या पोस्टमध्ये आपण पार्वतीचा नाथ त्रिभुवनात भक्तांचा कैवारी झाला Lyrics बघणार आहोत.
_________________

पार्वतीचा नाथ त्रिभुवनात भक्तांचा कैवारी झाला Lyrics

पार्वतीचा नाथ त्रिभुवनात
भक्तांचा कैवारी झाला
बारा ज्योतिर्लिंगामध्ये गाजला.. || धृ ||

शंभू मुक्त केले चंद्र तो झाला सोमनाथ
आज त्याला गणेशामुळे पहा म्हणती वैद्यनाथ
नंदादीप तेवती चहू बाजूला
कीर्तीचा डंका हा वाजला..
बारा ज्योतिर्लिंगामध्ये गाजला.. || १ ||

झाली प्रसन्न शिवशंकर त्या अर्जुनावरी भारी
अर्जुनाला ठरवून या श्रेष्ठ जगात धनुर्धारी
मल्लिकार्जुन भक्त पुकारी
कदली बिल्व गावात आजला
बारा ज्योतिर्लिंगामध्ये गाजला.. || २ ||

ज्या ठिकाणी दिले शिवाने
छोट्या बालकाला दर्शन
त्या चंद्रसेन राजाने केले तेथे हे उत्खनन
महाकाल रूप टिपले नयन
अमरावतीला प्रगटला...
बारा ज्योतिर्लिंगामध्ये गाजला.. || ३ ||

मार्लेश्वर तुंगारेश्वर पुण्याचा भीमाशंकर
भक्तासाठी स्वयंभू तो अवतरला या भूमीवर
त्र्यंबकेश्वर मी रामेश्वर म्हणते चंद्रमवळा ज्याला
बारा ज्योतिर्लिंगामध्ये गाजला.. || ४ ||

साऱ्या भक्ताच्या हाकेला धावे
तो कैलाशीचा राणा
असुरांच्या झुकती माना
कराया पावन आपले जीवन
ऋषीमुनींनी पूजला
बारा ज्योतिर्लिंगामध्ये गाजला.. || ५ ||

* * * * *
_______________

✅ हे भक्तीगीत पण नक्की वाचा👇👇👇

_______________

👀आज या पोस्ट मध्ये आपण पार्वतीचा नाथ त्रिभुवनात भक्तांचा कैवारी झाला Lyrics बघितले .

📜📜पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏🙏🙏 !!!!!!!!!
_______________




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.