-->

Header Ads

भाषा माझी मराठी बालगीत Lyrics | Bhasha Majhi Marathi Balgeeet



🙏🙏🙏नमस्कार या पोस्टमध्ये भाषा माझी मराठी बालगीत Lyrics बघणार आहोत.

__________________

💛भाषा माझी मराठी बालगीत Lyrics | Marathi💛

पोवाड्यांच्या शौर्याची
आरतीतल्या टाळ्यांची
अभंगातल्या विठू नामाची,
भाषा माझी मराठी....

भजनातल्या भक्तीची
गाऱ्हाण्यातल्या साकड्याची
गोंधळातल्या उदो उदोची...
भाषा माझी मराठी....

जात्यावरच्या ओवीची
कीर्तनातल्या कथेची
भारुडातल्या प्रबोधनाची
भाषा माझी मराठी....

कथा कादंबऱ्यांची
नाटक आणि कवितांची
बालगीत गोष्टींची
भाषा माझी मराठी....

देणगी ही शब्दांची
आठवण मातीची
अफाट या साहित्याची
भाषा माझी मराठी....
भाषा माझी मराठी....
हो भाषा माझी मराठी....

* * * * *
__________________


✅हि बालगीते पण नक्की वाचा👇👇👇
__________________

👀तर आज या पोस्टमध्ये आपण भाषा माझी मराठी बालगीत Lyrics बघितल्या. अधिक 📜📜पोस्ट वाचण्यासाठी साइटला पुन्हा भेट नक्की द्या.
__________________


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.

📑 Table of Contents