उन्हाळ्याची सुट्टी बालगीत Lyrics | Marathi Baalgeet
नमस्कार या पोस्टमध्ये आपण उन्हाळ्याची सुट्टी बालगीत Lyrics बघणार आहोत.
______________________
😍उन्हाळ्याची सुट्टी बालगीत Lyrics😍
संपली बुवा परीक्षा लागली आता सुट्टी
खोक्यातल्या खेळण्यांशी पुन्हा जमली गट्टी
झूम झूम विमान लागतं आकाशात उडू
घरभर पसरतात रंगीत रंगीत खडू
झाडावरच्या कैऱ्यांवर दुर्बिणीची नजर
नेम लावण्यासाठी क्षणात बॅचकी होते हजर
पिटुकली भातुकली मांडते मोठा संसार
लुटपटूचा स्वयंपाक क्षणात होतो तयार
उन्हाची दुपार पुस्तकात रमते
घरबसल्या दुनियेची सफर करून येते
संध्याकाळी निघते झोकात सायकलीची स्वारी
ट्रिंग ट्रिंग करत गावभर मारून येते फेरी
बॅट आणि बॉल चा रंगात येतो खेळ
कळत नाही कधी येते घरी जायची वेळ
गच्चीवर रात्री रंगतात भुतांच्या गोष्टी
भेंड्या लागतात गाण्यांच्या अगदीच वाटता भीती
काय वेळ तारीख वार यांच्याशी कट्टी
संपूच नये वाटते अशी उन्हाळ्याची सुट्टी...
संपूच नये वाटते अशी उन्हाळ्याची सुट्टी...
* * * * * *
______________________
✅ही बालगीते पण नक्की वाचा👇👇👇
______________________
📜📜पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏!!!!!!
______________________
Post a Comment