किलबिल किलबिल पक्षी बोलती Lyrics | Kilbil Kilbil Pakshi Bolati Lyrics
नमस्कार या पोस्टमध्ये आपण किलबिल किलबिल पक्षी बोलती Lyrics बघणार आहोत.
__________________________
🐤किलबिल किलबिल पक्षी बोलती Lyrics 🐤
किलबिल किलबिल पक्षी बोलती
झुळझुळ झुळझुळ झरे वाहती
पानो पानी फुले बहरती
फुलपाखरे वरवर भिरभिरती
स्वप्नी आले काही....
स्वप्नी आले काही
एक मी गाव पाहिला बाई...
किलबिल किलबिल पक्षी बोलती..
झुळझुळ झुळझुळ झरे वाहती..
पानोपानी फुले बहरती..
स्वप्नी आले काही एक मी गाव पाहिला बाई....
किलबिल किलबिल पक्षी बोलती...
त्या गावची गंमत न्यारी
इथे नांदती मुलेच सारी
कुणी न मोठे कुणी धाकटे
कोणी न वसते इथे एकटे
सारी हसती गाती नाचती
कोणी रडके नाही...
स्वप्नी आले काही एक मी गाव पाहिला बाई....
किलबिल किलबिल पक्षी बोलती...
नाही पुस्तक नाही शाळा
हवे तेवढे खुशाल खेळा
उडो बागडो पडो धडपडो
लागत कुणा नाही
स्वप्नी आले काही एक मी गाव पाहिला बाई....
किलबिल किलबिल पक्षी बोलती...
इथल्या वेली गाती गाणी
पऱ्या हसऱ्या येती जाती
झाडावरती चेंडू लटकती
शेतामधुनी बॅटी...
म्हणाल तेथे सारे होते उरे ना कोठे काही
स्वप्नी आले काही एक मी गाव पाहिला बाई....
किलबिल किलबिल पक्षी बोलती...
झुळझुळ झुळझुळ झरे वाहती..
पानोपानी फुले बहरती..
स्वप्नी आले काही एक मी गाव पाहिला बाई....
किलबिल किलबिल पक्षी बोलती...
* * * * * *
_________________
✅ही भक्ती गीते पण नक्की वाचा👇👇👇
__________________________
👀आज या पोस्टमध्ये आपण किलबिल किलबिल पक्षी बोलती Lyrics बघितले.
📜📜पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏!!!!!
__________________________
Post a Comment