Header Ads

ओवाळू तुम्हा गुरुराया Lyrics | Vandito Tumha Gururaya Lyrics| Akash Shinde



नमस्कार या पोस्टमध्ये आपण Vandito Tumha Gururaya Lyrics बघणार आहोत.


सॉंग ओवाळू तुम्हा गुरुराया
लिरिक्स - राजेंद्र सूर्यवंशी
सिंगर /म्युझिक - आकाश शिंदे


_________________________

🌷Vandito Tumha Gururaya Lyrics🌷


|| गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा
गुरुर साक्षात परब्रम्ह तस्मै श्री गुरुवे नमः ||

आकाशाच्या केल्या वाती
सप्तसागरी लावूनी ज्योती
लावूनी ज्योती ओवाळू तुम्हा गुरुराया
मनी ठेवूनीया प्रीती...
वंदितो तुम्हा गुरुराया...
मनी ठेवूनीया प्रीती|| धृ ||

सूर्य तेज पडती जसे सोनेरी धरती वरती
दिव्य हो तुमची काया धन्य ती तुमची मूर्ती
सांगू कशी ही महती..
विठ्ठलासाठी त्या पुंडलिकाची....
पुंडलिकाची ‌....
ओवाळू तुम्हा गुरुराया
मनी ठेवूनीया प्रीती...
वंदितो तुम्हा गुरुराया...
मनी ठेवूनीया प्रीती || १ ||

उघड पडलं आभाळ
तिथं थेंब नाही पाण्याचा
हृदयी श्वास हो अडकला
गुरु तुमच्या हो भेटीचा
जशी ओढ भेटीची लागे
श्रीकृष्णाला त्या सुदाम्याची...
सुदाम्याची...
ओवाळू तुम्हा गुरुराया
मनी ठेवूनीया प्रीती...
वंदितो तुम्हा गुरुराया...
मनी ठेवूनीया प्रीती || २ ||

जसा मोर नाचे वनाला..
आनंद होई मनाला..
स्पर्श तुमचा हो झालाया
वेड्या तुमच्या शिष्याला..
जशी गुरुसाथ ही लाभे मच्छिंद्रनाथ गोरक्षाची..
गोरक्षाची.... अलख निरंजन...
ओवाळू तुम्हा गुरुराया
मनी ठेवूनीया प्रीती...
वंदितो तुम्हा गुरुराया...
मनी ठेवूनीया प्रीती || ३ ||

छाती फाडून दावी हो भक्त हनुमंताला
हा देह मोक्ष लाविला जो मंत्र त्याने जपिला
जशी रामनामे ही प्रीती कळाली दास हनुमंताची..
हनुमंताची...
ओवाळू तुम्हा गुरुराया
मनी ठेवूनीया प्रीती...
वंदितो तुम्हा गुरुराया...
मनी ठेवूनीया प्रीती..|| ४ ||

आकाशाचा केल्यावाती
सप्तसागरी लावूनी ज्योती
लावूनी ज्योती ओवाळू तुम्हा गुरुराया
मनी ठेवूनीया प्रीती...
वंदितो तुम्हा गुरुराया...
मनी ठेवूनीया प्रीती ||

* * * * * *
______________________


✅ही भक्ती गीते पण नक्की वाचा👇👇👇

_________________________


👀आज या पोस्टमध्ये आपण Vandito Tumha Gururaya Lyrics बघितले.

📜📜पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏🙏🙏 !!!!!!!

_________________________


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.