कानिफनाथा मढीला येतोय Lyrics | Akash Shinde | Kaanifnatha Madhila Yeoy
नमस्कार आज या पोस्टमध्ये आपण कानिफनाथा मढीला येतोय Lyrics बघणार आहोत.
सॉंग - कानिफनाथा मढीला येतोय
लिरिक्स - किशोर , उमेश
म्युझिक /सिंगर - आकाश शिंदे
________________________
🌷कानिफनाथा मढीला येतोय Lyrics 🌷
अलख निरंजन आकाश नाव मी मुखात घेतोय ग
तुमच्या दर्शनाला कानिफनाथा मी मढीला येतोय... || धृ ||
महान योगी कानिफनाथ जगाचा आहे वाली
माझी खरी जिंदादिली त्यांच्यामुळेच चालू झाली
खऱ्या खोट्याचा हिशोब बाबा तिथून पाहतोय
तुमच्या दर्शनाला कानिफनाथा मी मढीला येतोय... || 1 ||
कपटी वैरी सोबत कधीच नसावे माझ्या कानिफनाथा
माझे पाहून चांगले दिवस त्यांचे पोट दुखतय आता
वाईट करणाऱ्याला चिमट्याचा फटका देतोय
तुमच्या दर्शनाला कानिफनाथा मी मढीला येतोय... || 2 ||
भक्त तुमचा संतोष भाऊ त्याला सदा सुखात ठेव
नाथ भक्त परिवार त्यांच आहे घोटी गाव
किशोर उमेशच गाणं आकाश आवडीनं गातोय
तुमच्या दर्शनाला कानिफनाथा मी मढीला येतोय... || 3 ||
अलख निरंजन आकाश नाव मी मुखात घेतोय ग
तुमच्या दर्शनाला कानिफनाथा मी मढीला येतोय... ||
* * * * *
________________________
✅ही भक्ती गीते पण नक्की वाचा👇👇👇
________________________
👀आज या पोस्ट मध्ये आपण कानिफनाथा मढीला येतोय Lyrics बघितले.
📜📜📜पोस्ट पूर्ण वाचल्याबददल खूप खूप धन्यवाद🙏🙏🙏 !!!!!
________________________
Post a Comment