कुठवर पाहू तुझी वाट येडू Lyrics | Yedamay Song Marathi
नमस्कार या पोस्टमध्ये आपण कुठवर पाहू तुझी वाट येडू Lyrics बघणार आहोत.
___________________
🌸कुठवर पाहू तुझी वाट येडू Lyrics 🌸
अशी चाहूल लावून माय लावू नको वाट
अशी चाहूल लावून माय लावू नको वाट
गेला दिस गेली रात आली पहाट ग येडू
कुठवर पाहू तुझी वाट.. (*२) || धृ ||
जवळच आहे असा भास
तरी का ग करती तू उदास
घट भरीला तुझा
चौक मांडूनी केला थाट
गेला दिस गेली रात आली पहाट ग येडू
कुठवर पाहू तुझी वाट.. (*२) || १ ||
हो जोडलंच माझ्या संग नातं
नको काढू शिरावर चहाट
माय लेकराच्या बंधनाची सोडू नको गाठ
गेला दिस गेली रात आली पहाट ग येडू
कुठवर पाहू तुझी वाट.. (*२) || २ ||
असं काय माझ्याकडून घडलं
सेवेत कमी काय पडलं..
अगं तुझ्या नावावरच भरतं चंदनाचं पोट..
गेला दिस गेली रात आली पहाट ग येडू
कुठवर पाहू तुझी वाट.. (*२) || ३ ||
अशी चाहूल लावून माय लावू नको वाट
गेला दिस गेली रात आली पहाट ग येडू
कुठवर पाहू तुझी वाट.. (*२) ||
* * * * * *
___________________
✅ही भक्ती गीते पण नक्की वाचा👇👇👇
- जागा कर येडू माझा कुंकाचा धनी Lyrics
- देखणं रूप येडामाईच Lyrics
- येडामाय तुझ्या माळेची कवडी मी असावं Lyrics
___________________
👀आज या पोस्टमध्ये आपण कुठवर पाहू तुझी वाट येडू Lyrics बघितले.
📜📜पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏🙏🙏 !!!!!
___________________
Post a Comment