Header Ads

माकडाचा दवाखाना मराठी सॉन्ग Lyrics | Makdacha Davakhana Baalgeet



नमस्कार या पोस्टमध्ये आपण माकडाचा दवाखाना मराठी सॉन्ग Lyrics बघणार आहोत.

____________________

🏥🐵माकडाचा दवाखाना मराठी सॉन्ग Lyrics 🐵🏥

हूप हूप बघा ना माकडाचा दवाखाना
हूप हूप बघा ना माकडाचा दवाखाना
खरं म्हणा खोटं म्हणा. हो इथे येती रोगी नाना..
लाकडाच्या वखारीत माकडाचा दवाखाना दवाखाना..

एक आली काळुबाई...🐧
तिचं नाव कोकिळाताई..
😑तिचा बिघडला गळा..
बारीक बारीक येती कळा..😒
माकड म्हणालं धीर धरा..😄
😃जरा थोडासा आ करा...😃
कोकिळेने केला आ...
🐵माकड म्हणालं वा...🐵

कोकिळा म्हणाली,
माकड दादा झालय तरी काय...
अहो हे तर टॉन्सिल्स टॉन्सिल्स...
अहो याच्यावर उपाय तरी काय..
चार महिने गाऊ नका..
उन्हा तानात जाऊ नका..
आंब्याचा मोहर खाऊ नका..

कोकिळाताई जरा विसावा घ्या
आणि मला बारा कैऱ्या आणून द्या...
हूप हूप बघा ना माकडाचा दवाखाना
हूप हूप बघा ना माकडाचा दवाखाना
लाकडाच्या वखारीत माकडाचा दवाखाना दवाखाना..

मनूताई भ्याल्या... दवाखान्यात आल्या..
माकड म्हणे या ताई बसा अशा शेजारी..
बोकोबाची चिल्लीपिल्ली कोण आहे आजारी..
मनी म्हणाली वैद्यबुवा यांच्यासाठी दवा हवा..
काय झालं बोकोबाला..
मनी म्हणे खोकला..
माकड म्हणालं बाईंना सांगा तुमच्या यजमाना..

दही दूध पिऊ नका.. उंदीर बिंदीर खाऊ नका..
अडगळीत जाऊ नका...
जास्त वणवण करू नका ..
गोळ्या देतो बगड्या छाप ..
तासातासानं दोन घ्या..
मला की नाही म्हणू ताई बारा केळी आणून द्या..

मग आला वखार वाला...
या रोगाला डॉक्टरच भ्याला‌‌...
रोग्याने घेतली काठी.. हाणली एक पाठी..
रोगी मारता राहीना...
अन माकडाला पळता येईना...
हूप हूप बघा ना माकडाचा दवाखाना
हूप हूप बघा ना माकडाचा दवाखाना
लाकडाच्या वखारीत माकडाचा दवाखाना दवाखाना..


* * * * * *
________________


✅ही बालगीते पण नक्की वाचा👇👇👇
____________________


👀आज या पोस्टमध्ये आपण माकडाचा दवाखाना मराठी सॉन्ग Lyrics बघितले.

📜📜पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏🙏🙏 !!!!!

____________________


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.