Header Ads

भक्त चालला शिर्डी वारीला Lyrics | Sai Marathi Bhajan



नमस्कार या पोस्टमध्ये आपण भक्त चालला शिर्डी वारीला Lyrics बघणार आहोत.

______________________

🌹 भक्त चालला शिर्डी वारीला Lyrics 🌹

साई प्रेमात न्हाऊन गेला
त्याचा जीव हो साईत जडला
कसा भेटेल हा देवाला
साई पालखीचा आला बहाना
भक्त चालला चालला शिर्डी वारीला
साई पालखीचा आला बहाना
भक्त चालला चालला साई वारीला... || धृ ||

दुःखाची सरून रात सुखाची होते पहाट
असंच काहीसं होतं साईची झाल्यावर भेट
साई विना हो काही कळेना मन कशात हो रमेना
कसा भेटेल हा देवाला
साई पालखीचा आला बहाना
भक्त चालला चालला शिर्डी वारीला...|| १ ||

शिर्डीच्या वाटेवरती साईची शितल छाया
पालखीच्या सहवासात थकली नाही ही काया
झाला वेडा पिसा बाबांचा
साई दर्शना आतुर झाला
कसा भेटेल हा देवाला
साई पालखीचा आला बहाना
भक्त चालला चालला शिर्डी वारीला.. || २ ||

बघता साई ची मूर्ती अश्रू गाली ओघळती
पाहुनी द्वारकामाई झाली इच्छापूर्ती
कंदील बाबा वाला जोडीला
रंग येणार हो भजनाला
कसा भेटेल हा देवाला
साई पालखीचा आला बहाना
भक्त चालला चालला शिर्डी वारीला... || ३ ||

* * * * * * *
________________


✅ही भक्ती गीते पण नक्की वाचा👇👇👇
______________________

👀आज या पोस्टमध्ये आपण भक्त चालला शिर्डी वारीला Lyrics बघितले.

📜📜📜पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏🙏🙏 !!!!!!

______________________

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.