येडामाय तुझ्या माळेची कवडी मी असावं Lyrics | Yedamay Tujhya Malechi Kavadi Mi Asav
नमस्कार या पोस्टमध्ये आपण येडामाय तुझ्या मायेची कवडी मी असावं Lyrics बघणार आहोत.
____________________________
🌹येडामाय तुझ्या मायेची कवडी मी असावं🌹
यूगायूगे मी तुझ्या गळ्यात दिसावं
आई गळ्यात दिसावं
तुझ्या माळेची आई कवडी मी असावं
येडामाय तुझ्या मायेची कवडी मी असावं..|| धृ ||
मानवाचा जन्म आई आहे हा खोटा
भक्तीच्या आज येऊ लागल्यात नोटा
गळ्यात राहुनी तुझं नाव जपावं
हे..तुझ्या माळेची आई कवडी मी असावं..|| १ ||
घडीचं सुख इथं आयुष्याचं कोड
सोडवता सोडवता झिजली माझी हाडं
असं जगण्यापेक्षा वाटतं जगणं नसावं
हे..तुझ्या माळेची आई कवडी मी असावं..|| २ ||
आता तरी येडू तुझं रूप मला दाव
मोहमयेचे नाव किनाऱ्याला लाव
मनोज बाळाला येडू पदरात घ्यावं
हे..तुझ्या माळेची आई कवडी मी असावं..|| ३ ||
यूगायूगे मी तुझ्या गळ्यात दिसावं
आई गळ्यात दिसावं
तुझ्या माळेची आई कवडी मी असावं
येडामाय तुझ्या मायेची कवडी मी असावं..||
* * * * * * * *
______________________
ही भक्ती गीते पण नक्की वाचा 👇👇👇
- नवरात्रीनिमित्त स्पेशल देवीची भजने
- डोंगर गरजला या अंबेचा (भक्तीगीत )
- चांदणं चांदणं झाली रात भक्त आले हे आंबे तुझ्या दारात Lyrics
_________________________
📝📝पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद💛💛💛 !!!!!!
_________________________
Post a Comment