Header Ads

जागा कर येडू माझा कुंकाचा धनी Lyrics | Jaga Kar Yedu Majha Kunkacha Dhani

 



🙏🙏🙏नमस्कार या पोस्टमध्ये आपण जागा कर येडू माझा कुंकाचा धनी Lyrics बघणार आहोत.
_____________________

🌷जागा कर येडू माझा कुंकाचा धनी Lyrics🌷

हाक मारते ग आई यावे धावूनी
भिक मागते ग येडू पदर पसरूनी
जागा कर ग येडू माझा कुंकाचा धनी
माझ्या कुंकाचा धनी... || धृ ||

कुण्या जन्मी मी केले होते पाप
कुण्या चांडाळानं दिला मला शाप
माझ्या धन्यावर कसा झाला कोप
कशी लागली ग आई तुला झोप
जाळ माझ्या हृदयामध्ये तरुणपणी
सांगू कुणाला मी जुन्या आठवणी
जागा कर ग येडू माझा कुंकाचा धनी..|| १ ||

पतीदेव माझ्या जीवाचा आधार
चिल्या पिल्या वरी पसरला अंधार
गणगोत सारी मायाचा बाजार
नको मला बहीण भावाचा शेजार
नंदा जावाची करीन भांडी धुणी
भीक मागत्याल माझी बाळ त्हानी‌.‌..
जागा कर ग येडू माझा कुंकाचा धनी..|| २ ||

पती देवावीन सूनं घरदार
कसा दुःखाचा पसरला डोंगर
दोन्ही हातांनं बडवू किती उरं
ये गं येडामाई धावून ये सत्वर
कुंकासाठी मानते त्या सुवासिनी
मंगळसूत्राला हवा काळा मणी
जागा कर ग येडू माझा कुंकाचा धनी..|| ३ ||

एकाएकी ही बिजली कडाडली
येडू माय माझी धावून आली
माझा शोक बघून प्रसन्न झाली
स्वप्ना परी जागधण्याला आली
विष्णुदास बंधू झाला आनंदी मनी
सत्व माझ्या येडाईचं घेते जाणूनी
जागा कर ग येडू माझा कुंकाचा धनी..|| ४ ||

हाक मारते ग आई यावे धावूनी
भिक मागते ग येडू पदर पसरूनी
जागा कर ग येडू माझा कुंकाचा धनी
माझ्या कुंकाचा धनी... ||

*******
____________________

✅ही भक्ती गीते पण नक्की वाचा👇👇👇

___________________

👀आज या पोस्टमध्ये आपण जागा कर येडू माझा कुंकाचा धनी Lyrics बघितले.

📝📝पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏🙏🙏 !!!!!
___________________


_____________________

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.