-->

Header Ads

माझं मरण येण्याआधी मला येडामाय दावा Lyrics | Majh Maran Yenyadhi



नमस्कार या पोस्टमध्ये आपण माझं मरण येण्याआधी मला येडामाय दावा Lyrics बघणार आहोत.

माझं मरण येण्याआधी मला येडामाय दावा Lyrics | Marathi

जगण्याचा अर्थ मात्र खोल आहे
व्यर्थ जरी झिजलो आजवरी चंदन
मरण्याचा क्षण माझा अनमोल आहे )

आल्या जन्मी योग यावा, एक शब्द खरा व्हावा
माझं मरण येण्याआधी मला येडामाई दावा..
येडामाई दावा.. येडामाई दावा.. || धृ ||

व्यापातापात आयुष्य झटलं,
धर्माचं धन मोह माया लुटलं
हो जीवनाची समसम कधी हो मिटलं,
येडूला पाहता पांग जन्माचा फिटलं..
नाही कोणी जिवाभावा...
आई करतो तुझा धावा..
माझं मरण ये

जीवनाच्या अंती एक प्रायश्चित्त व्हावं
येडामाय तू ग मला पदरात घ्यावं
माझा एक एक धावा, नीत संजीवनी लावा
माझं मरण येण्याआधी‌... || २ ||

उभ्या आयुष्यात मार्ग व्यक्तीकडे वळावा
शेवटी आत्मा मोक्षाला मिळावा
साऱ्या दुनियेला माझा शेवट करावा
नाव तुझ घेता देह हा झळावा
घडावी हीच सेवा, गीत चंदनाचा गावा
माझं मरण येण्याआधी‌... || ३ ||

आल्या जन्मी योग यावा, एक शब्द खरा व्हावा
माझं मरण येण्याआधी मला येडामाई दावा..
येडामाई दावा.. येडामाई दावा.. || धृ ||

* * * * *


हे पण नक्की वाचा 👇👇👇



आज आपण माझं मरण येण्याआधी मला येडामाय दावा Lyrics बघितले.

पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद !!!! 🙏🙏🙏🙏

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.