काळुबाई माझी लाडी ग तीची लागली मला गोडी Lyrics | Kalubia Majhi Ladi Ga
🙏🙏🙏नमस्कार या पोस्टमध्ये आपण काळुबाई माझी लाडी ग तीची लागली मला गोडी Lyrics बघणार आहोत.
______________________
🌸काळुबाई माझी लाडी ग तीची लागली मला गोडी Lyrics 🌸
आदिशक्तीच्या कृपेने आज बांधलीया माडी गं
अशी काळुबाई माझी लाडी गं
तिची लागली मला गोडी गं.. || धृ ||
सारं गणगोत हसायचे आहे
जवा नव्हतं माझ्याकडे अगं काही
अंत करण्यापासून हाक मारता तुला
माझ्या हाकला तू धावली काळुबाई
माझ्यावर जळणाऱ्यांचा
काळुबाई तूच काटा काढी गं
अशी काळुबाई माझी लाडी गं... || १ ||
निस्वार्थ मी जपली नाती
स्वार्थापूरत आईजवळ येती
पण माझ्या पावलोपावली तूच आई
अति करणाऱ्याची केली तू ग माती
मनी धरली ज्यान आढी
त्याला धरणीला तु पाडी ग...
अशी काळुबाई माझी लाडी गं.. || २ ||
आता जीवनी आशा उरली नाही काही
जन्मोजन्मी तुझीच सेवा घडू दे आई
तुला सांगताना नयनी अश्रू येई
लय ग सत्वाची ग हाय माझी काळूबाई
सुषमा आकाशाच्या दुःखाची
तोडली तू ग बेडी ग...
अशी काळुबाई माझी लाडी गं... || ३ ||
* * * * * * *
______________________
✅ही भक्ती गीते पण नक्की वाचा👇👇👇
______________________
📜📜पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏🙏🙏 !!!!!!
______________________
Post a Comment