बडबड गीत मराठी गाणी Lyrics | BadBad Geet Marathi Gani Lyrics
नमस्कार मित्रांनो, या पोस्टमध्ये तुम्हाला बडबड गीत मराठी गाणी Lyrics बघणार आहोत. खूप जुनी आणि सुंदर अशी बालगीते आपण इथे बघणार आहोत. तुम्ही पण लहानपणी तरी ऐकले असतील तर खाली कमेंट मध्ये नक्की सांगा.
बडबड गीत मराठी गाणी Lyrics | Marathi
🔥🔥⚡⚡👧👧👼👱👱⚡⚡🔥🔥
१. रुसु बाई रुसु कोपर्यात बसु
रुसु बाई रुसु कोपर्यात बसु
आमच्यासंगे बोला आता, ढिश्यू, ढिश्य, ढिश्यू
हाहा..... ही ही....... हो हो
आता तुमची गट्टी फू
आल बाल बारा वर्षं बोलू नका कोणी
चॉकलेट नका दाखवू हं, तोंडाला सुटेल पाणी
आमचा राजू का रुसला, आमचा राजू का रुसला ?
सांगशील का माझ्या कानी राग तुझा कसला ?
गाल गोबरे गोरे गोरे, लबाड डोळे दोन टपोरे
आनंदी हा चंद्र मुखाचा उदास का दिसला ?
राग तुझा कसला, आमचा राजू का रुसला ?
बावन पत्ते बांधु वाडा, शर्यत खेळू घोडा घोडा
घरदाराला खेळवणारा झाला हिरमुसला
राग तुझा कसला, आमचा राजू का रुसला ?
चिमणी खाई मोती-दाणे, गोड कोकिळा गाई गाणे
अल्लड भोळा गवई माझा अबोल का बसला ?
राग तुझा कसला, आमचा राजू का रुसला ?
⸎ ⸎ ⸎ ⸎
टप टप टप टप टाकित
टप टप टप टप टाकित टापा चाले माझा घोडा
पाठीवरती जीन मखमली पायि रुपेरी तोडा !
उंच उभारी दोन्ही कान
ऐटित वळवी मान-कमान
मधेच केव्हा दुडकत दुडकत चाले थोडा थोडा !
घोडा माझा फार हुशार
पाठीवर मी होता स्वार
नुसता त्याला पुरे इशारा कशास चाबुक ओढा !
सात अरण्ये, समुद्र सात
ओलांडिल हा एक दमात
आला आला माझा घोडा, सोडा रस्ता सोडा !
⸎ ⸎ ⸎ ⸎
न्हाऊ बाळा न्हाऊ
न्हाऊ बाळा न्हाऊ,
आंघोळीला जाऊ !
बशू बाई बशू,
पाटावरती बशू !
बुडु बुडु बुडू,
गोल गोल गडू !
फेस पहा फेस,
ओले ओले केस !
घुशु घुशु घुशू,
ओले अंग पुशू !
⸎ ⸎ ⸎ ⸎
वाढलं झाड सर सर सर
वाढलं झाड सर सर सर
बघताच गेलं वर वर वर
वर वर वर बघा गेलं झाड
लपून बसलं ते ढगा आड
ढग झाले जरी पाणी पाणी
गाऊ लागे गोड गोड गाणी
हसता हसता पाणी पडले
पाण्याची त्या झाली फुले
⸎ ⸎ ⸎ ⸎
वार्या वार्या थांब थांब
वार्या वार्या थांब थांब
जाउ नको लांब लांब
माकड भाउ थांब थांब
शेपटी तुझी लांब लांब
काउ काउ थांब थांब
चोच तुझी लांब लांब
शहामृगा थांब थांब
मान तुझी लांब लांब
ऊंटा उंटा थांब थांब
पाय तुझे लांब लांब
भित्र्या सशा थांब थांब
पळतो कसा लांब लांब
अरे पतंगा थांब थांब
दोरी तुझी लांब लांब
हत्ती दादा थांब थांब
सोंड तुझी लांब लांब
गाढव दादा थांब थांब
कान तुझे लांब लांब
कोंबडे दादा थांब थांब
तुरा तुझा लांब लांब
सरडे दादा थांब थांब
जीभ तुझी लांब लांब
हरणा हरणा थांब थांब
धाव तुझी लांब लांब
आगीन गाडी थांब थांब
घेऊन जा लांब लांब
ताई जरा थांब थांब
वेणी तुझी लांब लांब
दादा जरा थांब थांब
पॅन्ट तुझी लांब लांब
⸎ ⸎ ⸎ ⸎
छान छान छान
छान छान छान
मनीमाऊचं बाळ कसं गोरं गोरं पान
इवलीशी जिवणी नि इवलेसे दात
चुटुचुटु खाती कसा दूध आणि भात
इवले इवले डोळे, इवले इवले कान
इवल्याशा पायामध्ये इवलासा चेंडू
फेकिता मी घ्याया धावे दुडु दुडु दुडू
इवल्याशा शेपटीची झाली कमान
आली आली मनीमाऊ दूर जरा जाऊ
बाळाचि मज्जा सारी दुरुनिया पाहू
आईशी बाळ खेळे विसरुनी भान
⸎ ⸎ ⸎ ⸎
इवल्या इवल्याशा
इवल्या इवल्याशा
टिकल्या टिकल्यांचें
देवाचे घर बाई, उंचावरी
ऐक मजा तर ऐक खरी !
निळी निळी वाट
निळे निळे घाट
निळ्यानिळ्या पाण्याचे झुळुझुळु पाट
निळ्यानिळ्या डोंगरांत निळीनिळी दरी !
चांदीच्या झाडांना सोन्याची पानें
सोनेरी मैनेचें सोनेरी गाणें
सोन्याची केळी, सोन्याचा पेरू
सोनेरी आंब्याला सोन्याची कैरी !
देवाच्या घरात गुलाबाची लादी
मऊमऊ ढगांची अंथरली गादी
चांदण्याची हंडी, चांदण्याची भांडी
चांदोबाचा दिवा मोठा लावला वरी !!
⸎ ⸎ ⸎ ⸎
हम्मा हम्मा ये गं
हम्मा हम्मा ये गं
बाळाला दूध दे गं
चारा पाटीभर हम्माला
दूध वाटीभर बाळाला
हम्माच्या गळ्यात घुंगुरमाळा
बाळाच्या पायात चांदीचा वाळा
वाळा वाजतो छुम छुम
बाळ धावतो धुम धुम
⸎ ⸎ ⸎ ⸎
आजी बाई आजी बाई
आजी बाई आजी बाई
कुठे निघाला?
जाणार कुठे मी
जाते देवाला!
आजी बाई आजी बाई
बेल कशाला?
आज आहे सोमवार
महादेवाला!
आजी बाई आजी बाई
दुर्वा कशाला?
आज आहे मंगळवार
गणपतीला!
आजी बाई आजी बाई
हार कशाला?
आज आहे गुरुवार
दत्तगुरूला!
आजी बाई आजी बाई
तांदूळ कशाला?
आज आहे शुक्रवार
अंबाबाईला!
आजी बाई आजी बाई
तेल कशाला?
आज आहे शनिवार
मारूतीला!
⸎ ⸎ ⸎ ⸎
करंगळी, मरंगळी
करंगळी, मरंगळी
मधल बोट, चाफेकळी,
तळहात - मळहात,
मनगट - कोपर,
खांदा-गळागुटी-हनुवटी,
भाताचं बोळकं,
वासाचं नळक,
काजळाच्या डब्या,
देवाजीचा पाट,
देवाजीच्या पाटावर,
चिमण्यांचा किलबिलाट.
⸎ ⸎ ⸎ ⸎
खबडक खबडक घोडोबा
खबडक खबडक घोडोबा
घोड्यावर बसले लाडोबा.
लाडोबाचे लाड करतंय कोण?
आजी आजोबा मावश्या दोन.
भटो भटो कुठे गेला होतात?
भटो भटो कुठे गेला होतात?
कोकणात.
कोकणातून काय आणले?
फणस.
फणसात काय?
गरे.
गऱ्यात काय?
आठिळा.
तुम्ही खा गरे
आम्ही खातो गरे.
म्हशीला काय?
चारखंड.
⸎ ⸎ ⸎ ⸎
हे पण नक्की वाचा 👇👇👇
- छान छान बालगीते
- Apdi Thapdi Gulachi Papdi Lyrics
- Sang Sang Bholanath Lyrics
- Jhuk Jhuk Agin Gadi Lyrics
- Chiv Chiv Chimni Marathi Balgeet Lyrics
- Asava Sundar Chocolate Cha Bangla Lyrics
Post a Comment