मी पप्पाचा ढापून फोन Lyrics | मराठी बालगीत
नमस्कार या पोस्टमध्ये आपण मी पप्पाचा ढापून फोन Lyrics बघणार आहोत. खूप मजेदार असे हे बालगीत आहे.
________________
😀मी पप्पाचा ढापून फोन Lyrics📱📱
मी पप्पांचा ढापून फोन
फोन केले एकशे दोन...|| धृ ||
हॅलो हॅलो बोलतोय कोण
हॅलो हॅलो बोलतोय कोण
हॅलो हॅलो बोलतोय कोण
ए हॅलो...
आमचे नाव घेला शेठ
डोंगरा एवढे आमचे पेट.. (*२)
विकत बसतो साजूक तूप
सालं झापून खातो आम्हीच खूप.. (*२)
तुम्ही कोण काय तुमचे नाव
बोला झटपट तुमचे गाव
कसले नाव नी कसले गाव
Wrong number लागला राव..
मी पप्पांचा ढापून फोन
फोन केले एकशे दोन...|| १ ||
हॅलो हॅलो बोलतोय कोण
हॅलो हॅलो बोलतोय कोण
हॅलो हॅलो बोलतोय कोण
हॅलो.. हॅलो हॅलो
मी तर आहे अट्टल चोर
चंद्राची मी चोरून कोर..(*२)
झालो अंधारात पसार..
तारे उरले फक्त हजार..(*२)
तुम्ही कोण काय तुमचं नाव
बोला झटपट तुमचं गाव
तुम्ही कोण काय तुमचे नाव
बोला झटपट तुमचे गाव
कसले नाव नी कसले गाव
Wrong number लागला राव..
मी पप्पांचा ढापून फोन
फोन केले एकशे दोन...|| १ ||
हॅलो हॅलो बोलतोय कोण
हॅलो हॅलो बोलतोय कोण
हॅलो हॅलो बोलतोय कोण
हॅलो हॅलो ढगांमधून बोलतोय बाप्पा
चल मारू थोड्या गप्पा..(*२)
बाप्पा बोलतोयस तर मग थांब
सगळ्यात आधी एवढं सांग..
कालच होता सांगत पप्पा
तिकडे आलेत आमचे अप्पा
एक तर त्यांना धाडून दे
नाहीतर फोन जोडून दे..(*२)
तुला सांगतो अगदी स्पष्ट
अर्धीच राहिलीय आमची गोष्ट
त्यांना म्हणावं येऊन जा..
गोष्ट पुरी करून जा..
म्हणाले होते जाऊ भूर
एकटेच गेले केवढे दूर
डिटेल सगळा सांगतो पत्ता..
तिकडे पाठव आमचे अप्पा
बाप्पा बोला राव..
सांगतो माझं नाव अन् गावं
कसले नाव आणि कसले गाव..
Wrong number लागला राव.. || ३ ||
* * * * * *
________________
✅ही बालगीते पण नक्की वाचा👇👇👇
- एक होता ससा मराठी कविता
- बडबड गीत मराठी गाणी Lyrics
- सांग सांग भोलानाथ पाऊस पडेल काय
- मजेदार हास्य कविता ( मराठी )
______________________
👀आज या पोस्टमध्ये आपण मी पप्पाचा ढापून फोन Lyrics बघितले.
📜📜पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏!!!!!!!
______________________
Post a Comment