एक होता ससा मराठी कविता | Ek Hota Sasa Balgeet
एक होता ससा मराठी कविता
एक होता ससा,
सांगा पाहू कसा ?
पांढरा पांढरा रंग,
अन मऊ मऊ अंग
मोठे मोठे कान,
लाल लाल डोळे छान
काय बरे खातो ?
लठ्ठ मात्र दिसतो.....
असा हा ससा
धीट नाही तसा
चाहूल लागता पळतो
झाडाझुडपात लपतो
तुरु तुरु ह्याची चाल
पाहाल तर थक्क व्हाल...
असा हा ससा
ह्याला खूप खूप हसा...
§ § § §
हे पण नक्की वाचा 👇👇👇
तर आज आपण एक होता ससा मराठी कविता बघितली. अधिक मराठी गाण्यांच्या लिरिक्स साठी True Marathi Lyrics ला पुन्हा भेट नक्की द्या.
पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खुप धन्यवाद 🙏🙏🙏🙏
Post a Comment