Header Ads

संदीप खरे कविता संग्रह | Sandeep Khare Kavita Sangrah



नमस्कार, आज या पोस्टमध्ये आपण संदीप खरे यांच्या कवितांचा संग्रह बघणार आहोत.

    संदीप खरे कविता संग्रह

    📒📒📒    📜📜📜    📒📒📒

    मन तळ्यात मळ्यात

    मन तळ्यात मळ्यात
    मन नाजूकशी मोतीमाळ
    तुझ्या नाजूकशा गळ्यात
    उरीचा चाहुलींचे मृगजळ
    वाजे पाचोळा उगी कशात
    आणि झुळूक तुझ्या मनात
    व्हिडिओ लागे रात अंगालाशी
    तुझ्या नखाची कोर नभात
    माझ्या नयनी नक्षत्र तारा
    आणि चांद तुझ्या डोळ्यात

    - संदीप खरे

    ※  ※  ※  ※


    आयुष्यावर बोलू काही

    जरा चुकीचे जरा बरोबर बोलू काही
    चला दोस्त हो आयुष्यावर बोलू काही

    उगाच वळसे शब्दांचे हे देत रहा तू
    भिडले नाही डोळे तोवर बोलू काही
    चला दोस्त हो...

    तुफान पाहून तीरावर कुजबूजल्या होड्या
    पाठ फिरू दे त्याची नंतर बोलू काही
    चला दोस्त हो...

    हवे हवे से दुःख तुला जर हवेच आहे
    हवे हवे से हळवे कातर बोलू काही
    चला दोस्त हो...

    उद्या उद्याची किती काळजी बघ रांगेतून
    परवा आहे उद्याच नंतर बोलू काही
    चला दोस्त हो...

    शब्द असू दे हातामध्ये काठी म्हणून
    रात्र आंधळी प्रवास खडतर बोलू काही
    चला दोस्तहो आयुष्यावर बोलू काही...

    -संदीप खरे

    ※  ※  ※  ※


    तू सांग सखे मज काय

    मी सांगू या घरादारा ?
    समईचा जीव उदास
    माझ्यासह मिन मिन मिटतो

    ना अजून झालं मोठा
    हा स्वतंत्र अजूनी झालो
    तुज वाचून उमगत जाते
    तुज वाचून जन्मच अडतो

    - संदीप खरे

    ※  ※  ※  ※


    आताशा असे हे

    आताशा असे हे मला काय होते ?
    कुण्या काळचे पाणी डोळ्यात येते
    बरा बोलता बोलता स्तब्ध होतो
    कशी शांतता शून्य शब्दांत येते

    कधी दाटून येता पसारा घनांचा
    कसा सावळा रंग होतो मनाचा
    असे हालते हळुवार काही
    जसा स्पर्श पाण्यावरी चांदण्याचा

    असा ऐकू येतो क्षणांचा इशारा
    क्षणी व्यर्थ होतो दिशांचा पसारा
    नभातून ज्या रोज जातो बुडोनी
    नभाशीच त्या मागू जातो किनारा

    न अंदाज काही न अवधान काही
    कुठे जायचे यायचे भान नाही
    जसा गंध निघतो हवेच्या प्रवासा
    न कुठले नकाशे न अनुमान काही

    कशीही अवस्था कुणाला कळावे ?
    कुणाला पुसावे कुणी उत्तरावे ?
    किती खोल जातो तरी तोल जातो
    असा तोल जाता कूणी सावरावे ?

    - संदीप खरे

    ※  ※  ※  ※


    तो प्रवास कसला होता....

    तो प्रवास कसला होता,
    मी स्वतःस पुसूनी थकलो

    तू प्रारंभ केला अन
    मी अर्ध्यातून वळलो !

    तुजवरी लावला जीव
    हे मुळात चुकले माझे
    मी पाऊस हुडकायला
    ग्रीष्माच्या गावा शिरलो

    कधी जनातुनी ... कधी विजनी...
    कधी नयनी... मनात अंती
    कधी तुला शोधण्यासाठी
    बघ कुठवर वन वन फिरलो

    दिन रात धाडली तुजला
    मी निमंत्रणे ही कवितांची
    पण खरेच आलीस तेव्हा
    शब्दांच्या मागे दडलो

    मेंदी भरल्या हाताने
    सनईचे वेचीत सुर
    तू सुखात रडलीस तेव्हा
    मी उदास होऊन हसलो ....

    - संदीप खरे

    ※  ※  ※  ※


    दोन डोळे

    चल जीवा रात्र झाली गाठायचे घर
    दोन डोळे खोळंबले तिथे दारावर

    इथे तिथे नको करू, चल ना माघारी
    दारापाशी उभी कुणी वाट बघणारी

    घरा दारा चढे वाट बघण्याचा ज्वर
    दोन डोळे खोळंबले तिथे दारावर

    गावामध्ये कोसळला उधाण पाऊस
    तुझ्या घरी नाही पण पडला टिपूस

    तुझ्याविना आली तरी डोळ्यातून सर
    दोन डोळे खोळंबले तिथे दारावर

    - संदीप खरे

    ※  ※  ※  ※


    काळ्या मोत्यांपरी

    काळ्या मोत्यांपरी नेत्र हे ! ओठ माणकांपरी !
    सुवर्ण ओतून घडली काया ! कुंतल रेशीम सरी !
    संगमरवरी पोट निळतसे ! घट मोहाचे वक्षी !
    अवघड वळणे घेऊन फिरली तारूण्याची नक्षी !!
    वळणा वळणावरी चोरटे नेत्र पाजळून जागे
    आणि तनुवर मिरवीत खजिना तुला फिरावे लागे
    असे दागिने जडले बाई मोलाचे तव देही
    जन्मभराची जोखीम झाली ! कुणा कल्पना नाही !!

    - संदीप खरे

    ※  ※  ※  ※


    राधे रंग तुझा गोरा

    राधे रंग तुझा गोरा, सांग कशाने रापला ?
    सावळ्याच्या मिठीमध्ये रंग सावळा लागला

    राधे, कुंतल रेशमी... सैरभैर ग कशाने ?
    उधळले माधवाने किंवा नुसत्या वाऱ्याने ?

    राधे नूरले कशाने तूज वस्त्रांचेही भान ?
    निळा प्रणय अथवा एका बेभानचे ध्यान ?

    राधे कासावीशी अशी ... तरी वेडी कशी म्हणू ?
    तुझ्या रूपाने पाहिली एक वेडीपिशी वेणू

    राधे दृष्टीतून का घन सावळा थिजला ?
    इथे तुझ्या डोळा पाणी ... तिथे मुरारी भिजला !!!
    पुसटले साती रंग, एक श्रीरंग उरला !!

    - संदीप खरे

    ※  ※  ※  ※


    कुणीतरी बोलावतंय

    कुणीतरी बोलावतंय
    कुणीतरी हाक मारतंय
    बोलावतोय पण बोललं काय ?
    इतकं हळू कि कळत नाय ..
    बोलणं असं नाजूक शाप फुलांच कळ्यांचं
    कळलच नाय ...
    आपल्या कानी बोलणं असलं तलम हळू
    गाणं असलं पडलंच नाय
    लाजाळूच्या झाडामागे लाजाळूसे उभे राहून
    कुणीतरी बोलावतंय
    कुणीतरी हाक मारतंय ...
    फुले कशी येतात फुलून अचानक कळेना...
    वाटा कशा मध्यातून वळती कळेना....
    कळेना मनात कोण उगवला चांद
    उधानल्या दर्याचे कानाला निनाद
    सांग वाऱ्या सांडून हा सडा कोण गेलय ?
    दिसे फक्त प्राजक्ताचे झाड हलतय
    कुणीतरी बोलावतय ...

    - संदीप खरे

    ※  ※  ※  ※


    फिरायला जाताना

    फिरायला जाताना तरंगत जावे चांदण्यावर
    आणि जमिनीची पापी घ्यावी तसे अलगद
    टेकवावे पाऊल ....
    असे अल्लद चालल तेव्हाच येईल कळून
    गच्च गवत गर्दीत आधीच दडलेली असते
    आपली चाहूल..

    फिरायला जाताना असे हळुवार उच्चारावेत शब्द
    की ऐकू जायला हवेत ते त्याच्या त्याच्यात वाक्याला !
    इतक्या तरुण शब्दांआड दडलात तरच दिसेल
    बुटा वाचून धावती सिंड्रेला बाराच्या ठोक्याला
    फिरायला जाताना नुसतेच फिरत राहू नये
    चंद्राचे तुकडे थोडे थोडे गोळा करत राहावे
    डोक्यात हिरवा, रात्रीत निळा

    असे सारे थोडे थोडे रंग पेरत जावे
    फिरायला जाताना सगळे सगळे जावे
    आपण जे जे नाही, ते ते सारे होऊन पहावे
    देहासाठी शाल टोपी आणि मनासाठी
    तानह्या बाळासाठी जावळासारखे एक स्वप्न घ्यावे

    - संदीप खरे

    ※  ※  ※  ※



    हे पण नक्की वाचा 👇👇👇



    तर आज आपण या पोस्टमध्ये संदीप खरे कविता संग्रह बघितला. येथील तुमच्या आवडीची कविता कोणती आहे ते मला खाली कमेंट मध्ये सांगा आणि अधिक मराठी कविता आणि लिरिक्स वाचण्यासाठी True Marathi Lyrics  ला पुन्हा भेट नक्की द्या.

    पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद !!! 🙏🙏🙏🙏







    कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

    Blogger द्वारे प्रायोजित.