पिवळे तांबूस ऊन कोवळे मराठी कविता | Pivale Tambus Un Kovale Kavita (Marathi)
नमस्कार मित्रांनो, आज या पोस्टमध्ये आपण पिवळे तांबूस ऊन कोवळे मराठी कविता बघणार आहोत. ही कविता बालभारतीच्या जुन्या अभ्यासक्रमात इयत्ता तिसरी ला अभ्यासाला होती. भास्कर रामचंद्र तांबे हे या कवितेचे कवी आहेत. सूर्य आणि निसर्गावर आधारित असलेली ही एक सुंदर कविता आहे. चला तर मग बघूया पिवळे तांबूस ऊन कोवळे मराठी कविता -
पिवळे तांबूस ऊन कोवळे मराठी कविता
पिवळे तांबूस ऊन कोवळे पसरे चौफेर
ओढा नेई सोने वाटे वाहूनीया दूर
झाडांनी किती मुकुट घातले डोकीस सोनेरी
कुरणांवर शेतात पसरला गुलाल चौफेरी
हिरवे हिरवे गार शेत हे सुंदर साळींचे
झोके घेत कसे चहुकडे हिरवे गालिचे
सोनेरी, मखमली, रुपेरी पंख किती कांचे
रंग किती वर तऱ्हे तऱ्हेचे इंद्रधनुष्याचे
अशी अचल फुलपाखरे,
फुले साळीस जणू झुलती
झुळकं सुळूकन इकडून
तिकडे किती दुसरी उडती
हिरे मानके पाचू फुटूनी
पंखची गरगरती !
पहा पाखरे चरोणी होती झाडावर गोळा
कुठे बुडाला पलीकडे तो सोन्याचा गोळा
- भास्कर रामचंद्र तांबे
हे पण नक्की वाचा 👇👇👇
पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद !!!! 🙏🙏🙏🙏
Post a Comment