नमन ग केले महादेवाला Lyrics 💛💛 #महाशिवरात्री भजन
नमस्कार या पोस्टमध्ये आपण नमन ग केले महादेवाला Lyrics बघणार आहोत.
__________________
🌸नमन ग केले महादेवाला Lyrics🌸
जाऊन आले बाई मी त्रंबकेश्वराला..
नमन ग केले महादेवाला...|| धृ ||
महाशिवरात्री रात्र ग मोठी |
आनंद झाला गोदावरी काठी ||
केले बाई स्नान गोदावरीला |
नमन ग केले महादेवाला...|| १ ||
पूजेचे घेऊन सर्व साहित्य |
शिवलीलामृताचा पाठ ग नित्य ||
पाहिले मी बेलफुल शंकराला |
नमन ग केले महादेवाला...|| २ ||
गौतम ऋषीने तप केले फार |
गोदावरीची गुप्त सोडविली धार ||
निलगिरी ब्रह्मगिरी पर्वत वाहिला |
नमन ग केले महादेवाला...|| २ ||
महादेव पाहिले मी एकशे आठ|
गोरक्ष गुफेचा घाट ||
ज्ञानेश्वर मुक्ताबाई आश्रम पाहिला |
नमन ग केले महादेवाला...|| ३ ||
जाऊन आले बाई मी त्रंबकेश्वराला..
नमन ग केले महादेवाला...||
* * * * *
________________
✅ही भक्ती गीते पण नक्की वाचा👇👇👇
- आला आला नाचत शंकर भोळा Lyrics
- शिव पूजेचे महिमान ब्रह्मा घाली लोटांगण Lyrics
- महादेवाच्या पिंडीवर दुधाची धार Lyrics
- हर हर महादेवा जय शिव शंकरा Lyrics
______________
📜📜📜पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏!!!!!!
______________
Post a Comment