Header Ads

अग अग सुनबाई काय म्हणता सासूबाई Lyrics | Vaishali Samant , Priyanka Barve



नमस्कार या पोस्टमध्ये आपण अग अग सुनबाई काय म्हणता सासूबाई Lyrics बघणार आहोत.

____________________

😀अग अग सुनबाई काय म्हणता सासूबाई Lyrics 😃

सासूची कूडबूड सुनेची कूडबूड..
सासूची तडतड सुनेची तडतड..
तडतड तडतड रे...

काय ग बाई सासु सुनेचे रोजचंच आहे..
नाहीतर काय नुसती कटकट...

हा तुपात तळलं साखरेत घोळलं
कडू हे कारलं कडूच राहिलं...
वरून सळसूद महाबिलंदर ..

लालगंज ढोंगी डांबिस एक नंबर
पक्की डँबीस आहे ही...
डोक्याला शॉट..
बोचक्यात टाकते ती नोट...
चेटकिन वेडी हिटलर आगाऊ कोण ?

अगं अगं सुनबाई.. काय म्हणता सासूबाई...
अगं अगं सुनबाई.. काय म्हणता सासूबाई...
अग अग अग अग सुनबाई ...
अग अग अग अग सासूबाई...

अग अग अग अग अग
सत्यानाश...

शातिर तू डेंजर तू
नाचतेस गर गर गर....
शेरास सव्वाशेर मी..
ए आलीस तर अंगावर बेहद
कर गुर गुर गुरगुर...

शिंगावर घेणार मी...
मोडशील पण वाकणार नाही तू...
असा तुझा ताठा..
घाबरतेय काय तुला...
तोरा मिरवतेस मोठा तू...
दांगव करतेस खोटा..
खोटारडीच आहे...

डोक्याला शॉट..
बोचक्यात टाकते ती नोट...
चेटकिन वेडी हिटलर आगाऊ कोण ?

अगं अगं सुनबाई.. काय म्हणता सासूबाई...
अगं अगं सुनबाई.. काय म्हणता सासूबाई...
अग अग अग अग सुनबाई ...
अग अग अग अग सासूबाई...

पदरात पडलय ध्यान वेंधळा
हलक्यात घेऊ नको मी तर वादळ..
सुनामी येताच माझी.. झाला तुझा राडा...
नुसताच तू बुडबुडा..
फुटला बुडबुडा..
सुमार अकलेचा कांदा तू..
नर्मदेचा गोटा..
साडेसातीचा फेरा तू..
पिच्छा सोडेना येता जाता..
मानगुटीवर बसेन हा...

डोक्याला शॉट..
बोचक्यात टाकते ती नोट...
चेटकिन वेडी हिटलर आगाऊ कोण ?

अगं अगं सुनबाई.. काय म्हणता सासूबाई...
अगं अगं सुनबाई.. काय म्हणता सासूबाई...
अग अग अग अग सुनबाई ...
अग अग अग अग सासूबाई...

ही पोरगी ना डोक्यात जाते...
माझी सासू म्हणजे च्यूइंगम आहे च्यूइंगम

* * * * *
____________________


✅ही गीते पण नक्की वाचा👇👇👇
____________________

आज या पोस्टमध्ये आपण अग अग सुनबाई काय म्हणता सासूबाई Lyrics बघितले.

📜📜पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏🙏🙏 !!!!!!

____________________

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.