Header Ads

यावे यावे हो गणराया मला माहेराला न्याया Lyrics | Ganpati Bhajan Marathi



नमस्कार या पोस्टमध्ये आपण यावे यावे हो गणराया मला माहेराला न्याया Lyrics बघणार आहोत.
___________________

🌺यावे यावे हो गणराया मला माहेराला न्याया Lyrics🌺


यावे यावे हो गणराया,
मला माहेराला न्याया
आला गौरीचा सण, मोहरल मन,
माहेराला जाया..
यावे यावे हो गणराया
मला माहेराला न्याया ..|| धृ ||

मी सासुरवाशीन घरची
कोंड्या मांड्याचा संसार करती
गेली जिंदगी अशीच पुरती
तुझा आधार मंगलमूर्ती
नको संपत्ती धन दे समाधान
ठेवा तुझी छाया
यावे यावे हो गणराया
मला माहेराला न्याया..|| १ ||

जरी प्रेमळ माझे सासर,
मुला बाळांनी भरलं घर ..
माझं माहेर राहील दूर
उठे मनामध्ये काहूर
आता दुरावली नाती हरवली गोती
देरे तुझी माया
यावे यावे हो गणराया
मला माहेराला न्याया..||२ ||

साद कावळा घालितो दारी
गळा उबाळा दाटतो भारी

माया बापाची आठवण सारी
मन पाखरू घेते भरारी
येत माहेर डोळ्यासमोर
झुरते ही काया...
यावे यावे हो गणराया
मला माहेराला न्याया..||३ ||

आला गौरीचा सण, मोहरल मन,
माहेराला जाया..
यावे यावे हो गणराया
मला माहेराला न्याया ..||

यावे यावे हो गणराया
मला माहेराला न्याया ..
यावे यावे हो गणराया
मला माहेराला न्याया ..

यावे यावे हो गणराया
मला माहेराला न्याया ..

* * * * *
________________

✅ही भक्ती गीते पण नक्की वाचा👇👇👇
__________________


👀आज या पोस्टमध्ये आपण यावे यावे हो गणराया मला माहेराला न्याया Lyrics बघितले.

पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏!!!!!

_________________

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.