Header Ads

गावच्या फेरीला निघाला भैरवनाथ भक्तीगीत Lyrics | Gavchya Ferila Nighala Bhairavnath



नमस्कार या पोस्टमध्ये आपण गावच्या फेरीला निघाला भैरवनाथ भक्तीगीत Lyrics बघणार आहोत.


सॉंग - गावच्या फेरीला निघाला भैरवनाथ
लिरिक्स - कार्तिक दिनकर
सिंगर - आकाश शिंदे
म्युझिक - आकाश शिंदे


_______________________


🌹गावच्या फेरीला निघाला भैरवनाथ भक्तीगीत Lyrics 🌹

सोलापूर जिल्ह्यात त्या पांगरे गावात
सत्व राहिलं ध्यानात,
जोगेश्वरी संग गावच्या फेरीला निघाला भैरवनाथ...|| धृ ||
काशीचा भैरवनाथ..(*४)

पांगरे गावात जागृत ठाणं
न्हातं तिथं देव उनान
हे भक्तीची जिच्या ठेवली जाणं..
इंदापूराच्या माळीनीला पहिला मान
वाजे ढोल तुतारी नाथ माझा
घोड्यावर बसलाय मानात..
जोगेश्वरी संग गावच्या फेरीला 
निघाला भैरवनाथ...|| १ ||
काशीचा भैरवनाथ..(*४)

देवाचा दैत्याने करून घात
मारलाय मांडीवर हात...
हो हो निघाला मध्यराती सुमारास
देव माझा तो छबीन्यास...
सजविला घोडा वाट तुम्ही सोडा
देवाला जायाला गावात...(*२)
जोगेश्वरी संग गावच्या फेरीला 
निघाला भैरवनाथ...|| २ ||
काशीचा भैरवनाथ..(*४)

मशाली पेटवल्या ग ज्योती
भैरवनाथाची निराळी ख्याती
नाथ... इडा पिडा मागची जाते
गुलाल खोबरं आतिश हाती
नाथामुळं आज शुभम करतोय राज..
आकाश कार्तिकची साथ..
जोगेश्वरी संग गावच्या फेरीला 
निघाला भैरवनाथ...|| ३ ||
काशीचा भैरवनाथ..(*४)

* * * * *
_______________________


✅ही भक्ती गीते पण नक्की वाचा👇👇👇

_______________________

👀आज या पोस्टमध्ये आपण गावच्या फेरीला निघाला भैरवनाथ भक्तीगीत Lyrics बघितले.

📜📜पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏🙏🙏🙏 !!!!!!

_______________________




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.