Header Ads

वटसिद्ध नागनाथांनी ठेविले मच्छिंद्र बांधून Lyrics | Vatsidha Nagnathani Thevile Machindra Bandhun



नमस्कार या पोस्ट मध्ये आपण वटसिद्ध नागनाथांनी ठेविले मच्छिंद्र बांधून Lyrics बघणार आहोत.

___________________

🌸वटसिद्ध नागनाथांनी ठेविले मच्छिंद्र बांधून Lyrics 🌸

चंद्र, सूर्य, तारे, धरती साक्षीला आहे पुराणं
वटसिद्ध नागनाथांनी ठेवले मच्छिंद्र बांधून.. || धृ ||

योगी मधी योगी नाथ मच्छिंद्रनाथ निघाला
ऐकून महिमा नागनाथांच्या भेटीला
हो वडवळ गावी ठाण मांडीले मठाला...
शिष्य द्वारपाल त्यांन ठेवीला दाराला
मच्छिंद्रनाथांना अडविले रागानं लाल झाले
भस्म विभूती काढली भरून
वटसिद्ध नागनाथांनी ठेवले मच्छिंद्र बांधून.. || 1 ||

विभूती भरली नाथांनी स्पर्शास प्राण
द्वारपाल जमिनीवर ठेवली खिळवून
धावा गुरुराया आमचा वाचवा प्राण
ध्यान मग्न नागनाथ उठले दचकून
दृश्य पाहून चिडला नागनाथ युद्धाला भिडला
आकाशी गरुड ठेवला बांधून. .
वटसिद्ध नागनाथांनी ठेवले मच्छिंद्र बांधून.. || 2 ||

हो मच्छिंद्रनाथांनी पर्वतास्त्र सोडीले
वज्र सोडून नागनाथांनी ते हो तोडीले
दोघांमध्ये भयंकर अस्त्र युद्ध झाले
नागनाथांनी सर्प अस्त्र सोडले
सर्प हजारो निघाले दंश मच्छिंद्रास केले
होईना अस्त्राचेही निवारण
वटसिद्ध नागनाथांनी ठेवले मच्छिंद्र बांधून.. || 3 ||

धरती वरती मच्छिंद्रनाथ तळमळू लागला
धाव घ्या ना गुरुदत्त आवाज ठोकला
गुरुदेव दत्त. ..
दत्त दत्त म्हणता नागनाथानं ऐकला
भेटला गुरुबंधू झाला आनंद मनाला
हरी अक्षय ची जोडी रोशन करीतो लेखनी
आकाशने गायलं पुराणं..
वटसिद्ध नागनाथांनी ठेवले मच्छिंद्र बांधून.. || 4 ||

चंद्र, सूर्य, तारे, धरती साक्षीला आहे पुराणं
वटसिद्ध नागनाथांनी ठेवले मच्छिंद्र बांधून.. ||

* * * * * *
______________________


✅ही भक्ती गीते पण नक्की वाचा👇👇👇
______________________


👀आज या पोस्ट मध्ये आपण वटसिद्ध नागनाथांनी ठेविले मच्छिंद्र बांधून Lyrics बघितले.

📜📜पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏🙏🙏 !!!!!!!!

______________________

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.