Header Ads

साई दिगंबरा Song Lyrics | Sai Bhajan Marathi



नमस्कार आज या पोस्टमध्ये आपण साई दिगंबरा Song Lyrics बघणार आहोत.


सॉंग - साई दिगंबरा
लिरिक्स - मुकुंद भालेराव
सिंगर - अजय गोगावले
म्युझिक - पद्मनाभ गायकवाड

_____________________

🌷साई दिगंबरा Song Lyrics🌷

तुजविण साईनाथ आम्हा कोण वाली
धन्य धन्य झालो आम्ही, कृपा तुझी झाली
शिर्डी हीच पंढरी, साई हीच विठाई
ध्यानीमनी साईराम, दूज नसं काही
साई दिगंबरा यतीवरा ह्या जगी या लेकरा
कृपा करा गुरुवरा त्या पायी हो आसरा....

हो स्वामी साऱ्या जगताचा शिर्डीचा फकीर...
कुणी म्हणे साईनाथ कुणी साई पीर
गुंफुनिया धर्म सारे एका धाग्यातून
शिकविले बंधू त्याचे तूच आम्हा धून
पाहसी तू ब्रह्मा एक चराचरा ठाई
जातीपाती धर्म भेद तुज नसे काही
साई दिगंबरा यतीवरा ह्या जगी या लेकरा

कृपा करा गुरुवरा त्या पायी हो आसरा....
हो परब्रह्म घेऊन या आले नररूप
पाण्यातून आशेचे तू पेटवले दीप
जगताचा भार वाही शिर्डीत बसून
भवताप भक्तांचे तू हरीसी हसूनी
दीनानाथ दयाघनी कृपासिंधु साई
भूवरी वैकुंठ ही द्वारकामाई. ..
साई दिगंबरा यतीवरा ह्या जगी या लेकरा
कृपा करा गुरुवरा त्या पायी हो आसरा....

हो चुकल्यास वाट दावी दिव्य तुझी वाणी
तुझा स्पर्श होता मुढ होतो महाज्ञानी
साधुसंत पायरीशी माथा,
भयरोग दूर होईल शिर्डीत येता
जगतात धनी खरा तुझ्याविना नाही. .
गवसली साई रत्न जन्मांची पुण्याई
साई दिगंबरा यतीवरा ह्या जगी या लेकरा
कृपा करा गुरुवरा त्या पायी हो आसरा....

* * * * * * *
_______________________


✅ही भक्ती गीते पण नक्की वाचा👇👇👇
_______________________


👀तर आज या पोस्टमध्ये आपण साई दिगंबरा Song Lyrics बघितले.

📜📜पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏🙏🙏 !!!!!!

_______________________

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.