चांगभलं बोला रं नाथांच्या नावानं Lyrics | Changbhal Bola Ra Nathanchya Navan
नमस्कार या पोस्टमध्ये आपण चांगभलं बोला रं नाथांच्या नावानं Lyrics बघणार आहोत.
______________________
🌷चांगभलं बोला रं नाथांच्या नावानं Lyrics🌷
चांगभलं बोला रं नाथांच्या नावानं
सवाई सरजाच्या नावानं..
चांगभलं बोला रं श्रीनाथांच्या नावानं..
चांगभलं बोला रं सवाई सरजाच्या नावानं..|| धृ ||
निर गावाची जागृत शक्ती
खऱ्या मनानं करावी भक्ती
निर गावाला भाविक येती
आपणास होईल मिळेल मुक्ती
संसारी सुख होईल प्रगती
अंतरी पूजा येई प्रचिती
दारी गरीब श्रीमंत येती
दैवाची बोरी त्याच्याच हाती...
चांगभलं बोला रं श्रीनाथांच्या नावानं..
चांगभलं बोला रं सवाई सरजाच्या नावानं..|| १ ||
सोनारी चार सोनार सित
करसुंडी चार करसुंडी सीत
लावली चार लावलं सात
चारुड्या तार चारुंड सित
नाथांच्या संघ बाबांना बिरूद
राळाभरर जळावा उद
पुरणपोळीचा त्याला नैवेद्य
भावी भक्तांना मिळे प्रसाद
चांगभलं बोला रं श्रीनाथांच्या नावानं..
चांगभलं बोला रं सवाई सरजाच्या नावानं..|| २ ||
नाथ नांदतो निरनगरी संगे शोभे त्याला जोगेश्वरी
नाथ उभे राहिले सदरेवरी
देव तेथून नजर करी
दैन्य दुख नाथ दूर हे करी
पाहू तयाला निरनगरी
नाथ साहेबाचा महिमा भारी
फुल वाहू या चरणावरी..
चांगभलं बोला रं श्रीनाथांच्या नावानं..
चांगभलं बोला रं सवाई सरजाच्या नावानं..|| ३ ||
नाथांच्या लग्नाचा सोहळा छान
राऊत बंधूंना हळदीचा मान
नाही पुनवेच्या रातीला दिन
केळीच्या बडग्यांना छबिन्याला मान
नाथ साहेबांचा महिमा मान वाईच्या
बंधूंना पालखीचा मान..
निर गावाचे जागृत ठाणं
पाची भावांना दिला हो मान
चांगभलं बोला रं श्रीनाथांच्या नावानं..
चांगभलं बोला रं सवाई सरजाच्या नावानं..|| ४ ||
चांगभलं बोला रं श्रीनाथांच्या नावानं..
चांगभलं बोला रं सवाई सरजाच्या नावानं...
चांगभलं बोला रं श्रीनाथांच्या नावानं..
चांगभलं बोला रं सवाई सरजाच्या नावानं..
चांगभलं बोला रं श्रीनाथांच्या नावानं..
चांगभलं बोला रं सवाई सरजाच्या नावानं..
* * * * *
______________________
✅ही भक्ती गीते पण नक्की वाचा👇👇👇
______________________
👀आज या पोस्टमध्ये आपण चांगभलं बोला रं नाथांच्या नावानं Lyrics बघितले.
📜📜पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏!!!!!!!!
______________________
Post a Comment