सत्यनारायण केले या हो देवदर्शनाला Lyrics | Satyanarayan Kele Ya Ho Dev Darshanala
नमस्कार या पोस्टमध्ये आपण सत्यनारायण केले या हो देवदर्शनाला Lyrics बघणार आहोत.
सॉंग - सत्यनारायण केले
लिरिक्स - भूषण दुवा
सिंगर - प्रल्हाद शिंदे
म्युझिक मधुकर पाठक
म्युझिक लेबल - टी सिरीज
________________________
🌸सत्यनारायण केले या हो देवदर्शनाला Lyrics 🌸
सत्यनारायण केले या हो देवदर्शनाला
हात जोडूनी सांगतो या हो तीर्थप्रसादाला || धृ ||
शुभकार्याच्या आरंभी जमे भक्तांचा हा मेळा
पाहण्यास देव येई भावभक्तीचा सोहळा
सत्यनारायण या हो घेऊनीया लक्ष्मीला
सत्यनारायण केले या हो देवदर्शनाला.. || १ ||
स्वच्छ चौरंग पुसूनी बाळकृष्ण ठेविला
चार केळीचे हे खुंट बांधिला चौबाजूला
तिळा सौभाग्याचा भाळी सुवासिनीच्या लाविला
सत्यनारायण केले या हो देवदर्शनाला.. || २ ||
बोलवावे आप्त इष्ट त्यांचे घ्यावे आशीर्वाद
देऊनीया तीर्थ द्यावा हातात प्रसाद
देव धावूनी येतील बघा भक्तांच्या हाकेला
सत्यनारायण केले या हो देवदर्शनाला.. || ३ ||
सत्यनारायण पूजा दुःख निवारण करी
देव प्रसन्न झाला की रिद्धी सिद्धी पाणी भरी
या हो तुम्ही सारे जण कथा त्यांची ऐकायला
सत्यनारायण केले या हो देवदर्शनाला.. || ४ ||
देवा सत्यनारायणा करा तुम्ही चमत्कार
घेऊन या दोष पोटी करा भक्तांचा उद्धार
संत सांगे साऱ्या जगा देव भक्तीचा भुकेला
सत्यनारायण केले या हो देवदर्शनाला.. || ५ ||
* * * * *
________________________
✅ही भक्ती गीते पण नक्की वाचा👇👇👇
- घरी आले माझ्या श्री सत्यनारायण Lyrics
- सत्य नारायणा माझी नौका किनाऱ्याला लाव Lyrics
- चार बाजूला लाविल्या चार केळी Lyrics
________________________
आज या पोस्टमध्ये आपण सत्यनारायण केले या हो देवदर्शनाला Lyrics बघितले.
📜📜पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏🙏🙏 !!!!!!!
________________________
Post a Comment