Header Ads

घरी आले माझ्या श्री सत्यनारायण Lyrics | Satya Narayan Bhajan Marathi







नमस्कार या पोस्टमध्ये आपण घरी आले माझ्या श्री सत्यनारायण Lyrics बघणार आहोत.

________________________


🌸घरी आले माझ्या श्री सत्यनारायण Lyrics 🌸

भक्ती भावे करूया श्रीहरीचे पूजन
घरी आले माझ्या श्री सत्यनारायण.. || धृ ||

मनोभावे ऐकता श्रीहरीच्या कथा
दूर होतील साऱ्या अंतरीच्या व्यथा
तारक तू साऱ्या विश्वाचा अनंता
तुझ्या दर्शनाने माझी मिटली रे चिंता
तन मन अर्पूनिया करूया भजन
घरी आले माझ्या श्री सत्यनारायण.. || १ ||

सजविला चौरंग नारायण स्थापिला
पती-पत्नी जोड्याने बसले पूजेला
भटजी काका सुवाच्च मंत्र पठण करिती
लहान थोर सारे मिळून ओवाळती आरती
सुखी संसाराची बसेल घडी करता स्मरण
घरी आले माझ्या श्री सत्यनारायण.. || २ ||

ईश्वराच्या पूजनाने मनःशांती झाली
नारायणा सह घरी लक्ष्मी ही आली
तीर्थप्रसाद सेवनाने प्रचिती ही आली
दुःख दैन्य जाऊनी भरभराट झाली
महिमा थोर देवा तुझे करू पारायण
घरी आले माझ्या श्री सत्यनारायण.. || ३ ||

भक्ती भावे करूया श्रीहरीचे पूजन
घरी आले माझ्या श्री सत्यनारायण.. ||

* * * * *
_______________


✅ही भक्ती गीते पण नक्की वाचा👇👇👇

________________________

आज या पोस्टमध्ये आपण घरी आले माझ्या श्री सत्यनारायण Lyrics बघितले.

पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏!!!!!!
________________________

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.