पंढरीला जाण्याच आलय माझ्या मनी ग Lyrics | Pandharila Janyach Aalay Majhya Mani Ga
नमस्कार या पोस्ट मध्ये आपण पंढरीला जाण्याच आलय माझ्या मनी ग Lyrics बघणार आहोत.
______________________
🌷पंढरीला जाण्याच आलय माझ्या मनी ग Lyrics🌷
पंढरीला जाण्याचा आलय माझ्या मनी ग
कोण कोण येणार सांगा साऱ्या जणी ग.. || धृ ||
पंढरपुरात माझे पिता
निरोप त्यांचा आलाय आता
नाही नाही म्हणतोय कुंकवाचा धनी ग
कोण कोण येणार सांगा साऱ्याजणी ग.. || 1 ||
पंढरपुरात रुक्मिणी आई
निरोप त्यांचा आलाय बाई
नाही नाही म्हणतोय कुंकवाचा धनी ग
कोण कोण येणार सांगा साऱ्याजणी ग.. || 2 ||
पुंडलिक आहे माझा भाऊ
नामदेव पायरीचे दर्शन घेऊ
नाही नाही म्हणतोय कुंकवाचा धनी ग
कोण कोण येणार सांगा साऱ्याजणी ग.. || 3 ||
चंद्रभागा माझी बहीण
येता-जाता पाय धुईन
नाही नाही म्हणतोय कुंकवाचा धनी ग
कोण कोण येणार सांगा साऱ्याजणी ग.. || 4 ||
एका जनार्दनी पंढरीला जाऊ
रुक्मिणी आईला हळदी कुंकू लावू
बरोबर आहे कुंकवाचा धनी ग
नाही नाही म्हणतोय कुंकवाचा धनी ग
कोण कोण येणार सांगा साऱ्याजणी ग.. || 5 ||
* * * * *
_____________________
✅ही भक्ती गीते पण नक्की वाचा👇👇👇
- विठ्ठल माझा गं आहे उभा मंदिरात भजन Lyrics
- धन कमविले तुने कोट्यान कोटी रे Lyrics
- अशी रुक्मिणी बावरी झाली ग विठुरायाची नवरी झाली ग Lyrics
- शेवटची पाळी एक मनुष्य जन्म Lyrics
_____________________
👀आज या पोस्ट मध्ये आपण पंढरीला जाण्याच आलय माझ्या मनी ग Lyrics बघितले.
📜📜पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏🙏🙏 !!!!!!!
_____________________
Post a Comment