Header Ads

विठ्ठल माझा गं आहे उभा मंदिरात भजन Lyrics | Vithal Bhajan Marathi


नमस्कार या पोस्टमध्ये आपण विठ्ठल माझा गं आहे उभा मंदिरात भजन Lyrics बघणार आहोत.
______________________

🌸विठ्ठल माझा गं आहे उभा मंदिरात भजन Lyrics 🌸

घेऊ हाती फुलवात धरू मंदिराची वाट
विठ्ठल माझा ग आहे उभा मंदिरात.. || धृ ||

विठ्ठल बसायला चांदीचा पाट |
पाटाच्या भोवताली रांगोळी चा थाट ||
घेऊ हाती फुलवातधरू मंदिराची वाट |
विठ्ठल माझा ग आहे उभा मंदिरात.. || १ ||

विठ्ठलाला जेवायला चांदीचे ताट |
ताटाच्या भोवती लावते समया दाट ||
घेऊ हाती फुलवातधरू मंदिराची वाट
विठ्ठल माझा ग आहे उभा मंदिरात.. || २ ||

एका जनार्दनी विठ्ठलाचा थाट |
सावळा हरी पाहतो भक्तांची वाट ||
घेऊ हाती फुलवातधरू मंदिराची वाट
विठ्ठल माझा ग आहे उभा मंदिरात.. || ३ ||

घेऊ हाती फुलवातधरू मंदिराची वाट
विठ्ठल माझा ग आहे उभा मंदिरात.. ||

* * * * * *
________________________


✅ही भक्ती गीते पण नक्की वाचा👇👇👇
________________________

👀आज या पोस्टमध्ये आपण विठ्ठल माझा गं आहे उभा मंदिरात भजन Lyrics बघितले.

📜📝पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏🙏🙏 !!!!!!!
________________________

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

friztin द्वारे थीम इमेज. Blogger द्वारे प्रायोजित.