देव गेलेत गंगेवर Lyrics | Khandoba Bhaktigeet Marathi
नमस्कार या पोस्टमध्ये आपण देव गेलेत गंगेवर Lyrics बघणार आहोत.
सॉंग - देव गेलेत गंगेवर
लिरिक्स - समाधान जाधव
सिंगर - प्रशांत निकम
म्युझिक - निळू शेवाळे
______________________
🌷देव गेलेत गंगेवर Lyrics | Marathi🌷
देव गेलेत गंगेवर मल्हारी गेलेत गिरणेवर,
बानु नेलिया बरबर ना.......
देव धूवतोया मेंढरं बानु बसली काठावर.
देव धुतोया मेंढरं बानुबाई बसली काठावर.
देव गेलेत राणमधी मल्हार गेलेत जंगलामधी,
बानु देवाच्या संगती ना.......
देव चारीतो मेंढरं बानु बसली झाडाखाली,
देव वाळितो मेंढरं बानुबाई बसली झाडाखाली.
देव आलेत वाड्यावर खंडोबा आलेत वाड्यावर,
बानू टाकतीया नजर ना......
देव लावतोया वाघुर न बानू सोडती कोकरं.
देव माझा लावे वाघुर न बानू सोडतिया कोकरं.
देव गेलेत गड जेजुरी मल्हार गेलेत गड जेजुरी,
बानु नेली का घोड्यावरी ना.....
बानु ठेवली तळभोयरी मल्हार म्हाळसा गडावरी.
बानु ठेवली तळभोयरी मल्हार म्हाळसा गडावरी.
परशा वाघ्या गातो
गाणं न परशा वाघ्या गातो गाणं,
गुरूरायानं दिलंया ज्ञान.
कपाळी पिवळं सोनंन झाले
मल्हार प्रसन्न.(2)
* * * * * *
_________________
✅ही भक्ती गीते पण नक्की वाचा👇👇👇
______________________
📜📜पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏🙏🙏 !!!!!!!!!
______________________
Post a Comment