वरदविनायक गुणीजन पालक भक्ती गीत Lyrics | माघी गणेश जयंती विशेष भजन
नमस्कार या पोस्ट मध्ये आपण वरदविनायक गुणीजन पालक भक्ती गीत Lyrics बघणार आहोत.
____________________
🌺वरदविनायक गुणीजन पालक भक्ती गीत Lyrics🌺
वरदविनायक गुणीजन पालक
शिवसूत आला घरा...
गणपती बाप्पा मोरया
मंगलमूर्ती मोरया....(*2)|| धृ ||
करपुरागौरा जगदधारा
तू सकलांचा त्राता
महागणपती गिरिजात्मज तू
धावून येई आता
संकटकाळी तूच ईश्वरा
होशी आमुचा भाग्यविधाता. .
देवा आमचा घ्या मुजरा..
वरदविनायक गुणीजन पालक
शिवसूत आला घरा...
गणपती बाप्पा मोरया
मंगलमूर्ती मोरया...(*2) || 1 ||
ब्रम्हांडाचा तू निर्माता
तू विश्वाची माता..
तुझं सम प्रेमळ नाही दूजा कुणी
रिद्धी सिद्धीकांता
तू रे आत्म तुची ईश्वर
तू ममतेचे रूपाची जगता
मजला कुणीही ना दुसरा
वरदविनायक गुणीजन पालक
शिवसूत आला घरा...
गणपती बाप्पा मोरया
मंगलमूर्ती मोरया....(*2) || 2 ||
तू वायू तू अग्निजल तू
तू तेजाची आभा....
तू आशीर्वज तू शुभचिंतक
तू करूणेचा गाभा..
तूच कृपाळा देशी जीवन...
तू विद्या तू अमृत प्रतिभा
लय तू देशी हृदय स्वरा...
वरदविनायक गुणीजन पालक
शिवसूत आला घरा...
गणपती बाप्पा मोरया
मंगलमूर्ती मोरया....(*2) || 3 ||
* * * * *
____________________
✅ही भक्ती गीते पण नक्की वाचा👇👇👇
- करू नमन पार्वती नंदन Lyrics
- पार्वती बोले गणा सांग कशी मी राहूना Lyrics
- हृदयाच्या तालावर नाचे गणेशु
- गणपती भजन मराठी Lyrics
____________________
👀आज या पोस्ट मध्ये आपण वरदविनायक गुणीजन पालक भक्ती गीत Lyrics बघितले.
📜📜पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏!!!!!!
____________________
Post a Comment