सुटली मोहमाया लाभली साईछाया Lyrics | Sai Baba Bhajan Marathi
नमस्कार या पोस्टमध्ये आपण सुटली मोहमाया लाभली साईछाया Lyrics बघणार आहोत.
सॉंग - सुटली मोहमाया लाभली साई छाया
लिरिक्स - साईरत्न श्री श्रावण इंगळे
सिंगर - मंगेश शिर्के
म्युझिक - अशोक (दादा) वायांगणकर
_____________________
🌷सुटली मोहमाया लाभली साईछाया Lyrics🌷
अहो झालं धन्य मी वारी करून
गेली बदलून माझी काया
सुटली मोहमाया लाभली साईछाया... || धृ ||
दरवर्षाला घडते ही शिर्डीची वारी
हसत खेळत जातो मी त्या साई दरबारी
हो पाहून या देवाला आनंद होई भारी
शब्द अपुरे पडती महती त्याची गाया
सुटली मोहमाया लाभली साईछाया... || १ ||
अहो त्याच्या दरबारी कमी कसलीच नाही
जे जे मागतो मी ते देतोया साई
हो दयाळू त्याच्या वाणी पाहिला मी नाही
नवस जात नाही त्याच्या दरबारात वाया
सुटली मोहमाया लाभली साईछाया... || २ ||
हो कृपेने त्याच्या माझं आनंदी घर
असं वाटतं जणू हा त्याचा परिवार
हो हो येतो धावून हाकेला बाबा माझा सत्वर
हा बाळ झाला लीन या सद्गुरूच्या पाया
सुटली मोहमाया लाभली साईछाया... || ३ ||
* * * * * *
_____________________
✅ही भक्ती गीते पण नक्की वाचा👇👇👇
- भक्त चालला शिर्डी वारीला Lyrics
- उघड्या डोळ्यांनी बघशील तू साईलीला Lyrics
- गुरुवार माझ्या साईचा हाय वार Lyrics
_____________________
👀आज या पोस्टमध्ये आपण सुटली मोहमाया लाभली साईछाया Lyrics बघितले.
📜📜पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏🙏🙏 !!!!!!!
_____________________
Post a Comment